अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:34 IST2021-09-08T04:34:48+5:302021-09-08T04:34:48+5:30

आमगाव : अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी करीत जिल्हा काँग्रेसचे जमील अहमद खान यांनी आमदार सहषराम ...

Solve Minority Issues () | अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवा ()

अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवा ()

आमगाव : अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी करीत जिल्हा काँग्रेसचे जमील अहमद खान यांनी आमदार सहषराम कोरोटे यांना निवेदन दिले.

निवेदनात मुस्लिम स्मशानभूमीची सुरक्षा भिंत व रस्ता त्वरित बनविण्यात यावा तसेच वीज व्यवस्था करण्यात यावी, नवतलाव येथे मजारमध्ये ये-जा करण्याकरिता रस्ता व संपूर्ण परिसराचे सौंदर्यीकरण करून सभा मंडप तैयार करण्यात यावे, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी अबुल कलाम आजाद सार्वजनिक विवाह सभागृहात किचन शेड व शौचालय तयार करण्यात यावे, आदी मागण्या नमूद आहेत. निवेदन देताना तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय बहेकार, सचिव महेश ऊके, अमीन खान, मोहम्मद अली, संपत सोनी, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष छबू उके, नगर अध्यक्ष प्रभा उपराडे, बाबूराव कोरे, ताहिर खान, मोहम्मद हुसैन, शंकर रहांगडाले, आसिफ अली, अकरम कुरेशी, अंकेश गायधाने, शब्बीर अहमद खान, गणेश हुकरे, मतीन कुरेशी, बाबूराव मेंढे, मोहित खान आदी उपस्थित होते.

Web Title: Solve Minority Issues ()