युवकाने जपली सामाजिक बांधिलकी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:24+5:302021-02-05T07:50:24+5:30
: शहरात सध्या काही दिवसांपासून भटकंती करणारी कुटुंबे वास्तव्यास आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल या उद्दात हेतूने ही कुटुंबे शहरात ...

युवकाने जपली सामाजिक बांधिलकी ()
: शहरात सध्या काही दिवसांपासून भटकंती करणारी कुटुंबे वास्तव्यास आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल या उद्दात हेतूने ही कुटुंबे शहरात उघड्या आकाशात डेरेदाखल झाली आहेत. स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांत या भटकंती करणाऱ्या कुटुंबांना स्वातंत्र्याचा साधा मागमूसही नाही. अशात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकीकडे तरुणाई आकंठ जल्लोषात बुडाली असताना १८ वर्षीय तरुणाने त्यांना भाजीपाला, धान्य व चादर वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
मनिष डोमेश्वर बारेवार असे त्या तरुणाचे नाव असून त्यांनी २५ जानेवारी रोजी या कुटुंबांना भाजीपाला, तांदूळ, कापड, फळे, पुलाव आणि थंडीत उबदार चादर देऊन सामाजिक बांधिलकी जपली. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मनिष आजपर्यंत बरीच सामाजिक कामे करून सामाजिक बांधिलकी जपत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनिष सामाजिक कार्यात आहे. मनुष्य गरजेपेक्षा जास्त कमवितो व त्यातील काही तरी दान केले पाहिजे. दान केल्याने कमी होत नाही. प्रत्येकाने आयुष्यात काही ना काही दान केले पाहिजे. हल्ली अनेकांना राहायला घर नाही. रोजगाराचा मोठा प्रश्न ऐरणीवर आहे. अशावेळी रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या कुटुंबांना मदत मिळावी, असे मत मनिष बारेवार यांनी व्यक्त केले.