कही खुशी कही गम

By Admin | Updated: July 28, 2015 02:43 IST2015-07-28T02:43:57+5:302015-07-28T02:43:57+5:30

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सोमवारी लागलेल्या निकालाने शांत

So happy gum | कही खुशी कही गम

कही खुशी कही गम

गोंदिया : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सोमवारी लागलेल्या निकालाने शांत झाला. यात अनेकांना अनपेक्षित हार पत्करावी लागली, तर काहींना विजयाची लॉटरी लागली. त्यामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती सर्वत्र पहायला मिळाली.
जिल्ह्यातील आठही तालुक्यात १८१ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत २७९ उमेदवारांविरोधात दुसऱ्या कोणीही नामांकन दाखल न केल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली. मात्र ३०७५ उमेदवारांमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम झाला. शनिवारी झालेल्या मतदानाला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कुठे कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना होती. सोमवारी सकाळी १० वाजता सर्व तालुकास्थळी मतमोजणीला सुरूवात झाली. अवघ्या दिड ते दोन तासात सर्व निकाल जाहीर झाले. त्यामुळे विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि मिरवणुका काढून विजयाचा आनंद साजरा केला.
राकाँने मारली बाजी
ंआमगाव : तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची सोमवारला मतमोजणी झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पार्टीला तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला यश मिळाले. काही ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्वाच्या लढाईत असमंजसपणा दिसून येत आहे. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर निवडून येत नसली तरी राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी यात सहभाग घेतला होता.
मतमोजणीनंतर राष्ट्रवादीने वळद, रामाटोला, शिवणी, महारीटोला, सरकारटोला, येरमडा, ठाणा, मरारटोला, धावडीटोला, मुंडीपार, बासीपार, सोनेखारी, भाजपा घाटटेमनी, कालीमाटी, कट्टीपार, किकरीपार, बंजारीटोला, चिरचाळबांध, आसोली, जामखारी, अंजोरा तर कुंभारटोली येथे काँग्रेस-भाजप युती असल्याने तेथे भाजपा, बीएसपी, काँग्रेस यांना सहा तर राष्ट्रवादीला तीन जागेवर समाधान मानावे लागले. गोसाईटोला येथे भाजपा तीन तर राष्ट्रवादीचे चार उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे येथे अनुसूचित जातीची प्रभाबाई शिवबन्सी भाजपाच्या विजयी उमेदवार ठरल्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे चार उमेदवार विजयी झाले तरी त्यांच्याकडे अनुसूचित महिला उमेदवार नसल्याने गोसाईटोलाचे सरपंचपद भाजपाच्या वाट्याला जाणार आहे.
तालुक्यात १२ ठिकाणी राष्ट्रवादी तर ९ ठिकाणी भाजपाला एक हाती सत्ता मिळाली. बऱ्याच ठिकाणी भाजपा व काँग्रेसची युती असताना सुद्धा राष्ट्रवादीने अनेक ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली तर घाटटेमनी येथून जिल्ह्याच्या माजी महिला व समाजकल्याण सभापती संगिता दोनोडे यांना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीवरुन तालुक्यात भाजपाला मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
अनेक मतदार वंचित
मुंडीकोटा : जवळ असलेल्या घोगरा व पाटीलटोला या गटग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २५ जुलै रोजी मतदान झाले. पण मतदार यादीत घोगरा व पाटीलटोला या दोन्ही गावी मतदार यादीत अनेक नावांचा घोळ झाल्याचे दिसत आहे. ही यादी घोगरा तलाठी यांनी तयार केलेली होती.
अनेक व्यक्तीची नावे या यादीत आली नाहीत. नुकत्याच झालेल्या जि.प. व पं.स. निवडणुकीत यादीत अनेकांची नावे होती. पण ग्रा.पं.च्या मतदार यादीत घोगरा व पाटीलटोला या गावातील काही व्यक्तीची नावे गहाळ झालेली आहेत. पण ही नावे गहाळ कशी झाली? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे. येथील तलाठी यांनी मतदान यादी कशी तयार केली, असा रोष गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बाबुराव गोपाळा खळोदे घोगरा असे नाव आहे. पण गोपाळाऐवजी गणपत करण्यात आले. अशाच प्रकारे गावातील अनेक व्यक्तीची नावे मतदान यादीतून गहाळ झालेली दिसत आहे. त्यामुळे त्यांनी ग्रा.पं. निवडणुकीत मतदान करता आले नाही. याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

ईश्वरचिठ्ठीने कोणाला तारले, कोणाला मारले
४जवळपास सर्वच तालुक्यात काही ठिकाणी दोन उमेदवारांना सारखीच मते पडली. त्यामुळे त्या तालुक्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा निकाल ईश्वचिठ्ठीने काढण्याचा निर्णय घेतला. दोन्ही उमेदवारांच्या नावांच्या चिठ्ठ्या टाकून त्यापैकी एक चिठ्ठी बालकाच्या हाताने काढण्यात आली आणि त्यात ज्याचे नाव होते त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. गोंदिया तालुक्यात गिरोला ग्रामपंचायतमध्ये दिनेश शालीकराव काटेवार यांची अशी पद्धतीने ईश्वरचिठ्ठीने निवड झाली. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संजय पवार यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ना.तहसीलदार निलेश पाटील, सोमनाथ माळी, विजय पवार, तसेच विस्तार अधिकारी अशोक बरईकर, एम.डी.पारधी, रमेश भांडारकर यांनी निवडणूक शांततेत पार पाडली.

मतदार यादीत मृताचे नाव, जिवंत व्यक्तीला मात्र वगळले
४माजी सरपंच वसंतराव भांडारकर व त्याच्या पत्नी हे दोघेही हयात असून त्यांची नावे मतदार यादीतून गहाळ करण्यात आली. तर त्यांचे लहान बंधू रवींद्र भांडारकर हे गेल्या फेब्रुवारी महिन्यात मरण पावले. मेलेल्या व्यक्तीचे नाव मतदान यादीत समाविष्ट आहे. पण जिवंत व्यक्तीचे नाव या यादीत का गायब झाले, याबाबत तर्कवितर्क निर्माण होत आहे.
४घोगरा येथील काही व्यक्ती कामानिमित्ताने बाहेरगावी गेले आहेत. त्यांचे पण नाव या यादीत नाहीत. त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, तसेच घोगरा या गावी स्वत:चे घर आहे. अशा व्यक्तीचे नाव मतदान यादीत आले नाहीत.

ग्रामपंचायत निवडणूक निकाल गोंदिया तालुका
४लोधीटोला (धापे.) : गोविंदकुमार हेतलालसिंह बघेले, लक्ष्मीबाई मुन्नालाल कुंडभरे, चित्रकला मुनेश्वर सोलंकी, रामेश्वर रामचंद ठकरेले, महेंद्रकुमार शिवलाल गयगये, शारदा नरेंद्र नागरीकर, सुरेंद्र ग्यानीराम मेश्राम, कल्पना महेंद्र लिल्हारे, उर्मिला आनंद दमाहे.
४धापेवाडा : जितेंद्र वासुदेव मेश्राम, पवन चुन्नीलाल बनोटे, रितू तेजलाल कटरे, महेंद्र जैपाल कटरे, किरण उमेश मेश्राम (बिनविरोध), रीना प्रदीप रोकडे, धनराज हरीराम दोनोडे, कौतीका ओमराज येरणे, शालूबाई शालीकराम पटले.
४बलमाटोला : व्यंकटराव राजाराम मेश्राम, नमीताबाई नैनराम शहारे, सुशील उरकुडदास शहारे, सुशीलाबाई गेंदलाल मसराम, अनिल रविदास डोंगरे, इंदू महेश मेश्राम, गीता रुवेंद्र टिकापाचे.
४सोनबिहरी : कृपाल दुलीचंद लिल्हारे, मीरा सुरेश नागपुरे, मनोहर पुरणलाल लिल्हारे, तुलसीबाई तेजराम बोहणे, गीरजाशंकर प्रेमलाल बिरणवार, मीनाबाई नरेंद्र चोखांद्रे, पुष्पकला रुपलाल लिल्हारे.
४नवेगाव (पांढराबोडी) : सुनीलकुमार चतरुजी सुलाखे, भूमेश्वरी रामू मांडवे, राजकुमार जितलाल सुलाखे, यशोदा मंगलदास शेंडे, तिजेश साहेबलाल गौतम, लक्ष्मीबाई नोकलाल सुलाखे, योगेश्वरीबाई योगेश्वर रहांगडाले.
४एकोडी : घनश्याम फुलचंद पटले, मायाबाई मयाराम तायवाडे (बिनविरोध), गीता प्रकाश भलावी, टेकलाल लक्ष्मण चौधरी, देवलाल गणेश टेंभरे, चित्रकला तेसराम वघारे, रविकुमार ईश्वरदलाय पटले (बिनविरोध), चंद्रप्रभा विजय पटले (बिनविरोध), वैशाली विष्णदुयाल बिसेन (बिनविरोध), अजाबराव सुरजलाल रिनायत, सविता संतोष राणे, नामदेव मोहन बिसेन, मंग़ला विनोद भदाडे.
४भानपूर : दिलीपकुमार पुरनलाल बारेवार, रमेश गजानन चिल्हारे, कविता ओमप्रकाश नेवारे, दुलीचंद गोविंदासाव चौरीवार, शकुंतला भरतलाल उपवंशी, चेतनाबाई भेजेंद्र चौरीवार, छगनलाल गेंदलाल चौरीवार, नलिनी विरेंद्र खोब्रागडे, प्रिती किरण गौतम.
४सेजगाव : नोकेश्वरी रामेश्वर चौरागडे, ममताबाई पृथ्वीराज बारेवार, पुजाबाई कैलाश पटले, मुन्नालाल नोहरलाल नागपुरे, शिलाबाई ऊर्फ लालावती राजेंद्र धुर्वे, विजयलता कृष्णकुमार कंसरे, गोविंदराम सियाराम बिसेन, अशोककुमार होलीराम डोंगरे, तरासन मुनेश्वर कावळे.
४खर्रा : बलूसिंग संपत नागभिरे, ललीताबाई ग्यानीराम वट्टी, बेनुबाई शोभेलाल काटेवार, धरमसिंह मारोती टेकाम, जगन्नाथ दयाराम रेवतकर, जयवंताबाई लक्ष्मण लामकासे, प्रेमलाल केऊ लामकासे, कलाबाई छगनलाल मरस्कोल्हे, रमिलाबाई हौसलाल भगत.
४गंगाझरी : कृष्णकुमार गेंदलाल पंधरे, अंजनाबाई मोहनलाल कुंभरे, आशा दुर्गेश गायधने, मोहनलाल रंगलाल मरस्कोल्हे, हेमंत सुरेशचंद्र बघेले, ममता गजानंद लिल्हारे, किशोर गजानन मेश्राम, मंगला राजू चिचखेडे, बेला रघुविरसिंह उईके.
४मोगर्रा : मोतीरामसिंह हमेरसिंह नैकाने, ललीताबाई रविकुमार बिरणवार, दुर्गेश्वरी पप्पु कुशराम, रोशनलाल कोठुलाल लिल्हारे, दिलीपसिंह भोजरासिंह मुंडेले, शशीकला जितेंद्र नैकाने, सुरेंद्र गजानन बिरनवार, खेलनबाई मधु घोडमारे, पदमाबाई राजेशसिंह गुरबेले.
४रावणवाडी : गणेश गेंदलाल शरणागत, उर्मिलाबाई महेश फसफसे, मंजुलता अरविंद जौंजाल, कैलाश पेंढारी कुंजाम, जसविरसिंह कपुरसिंह निरंकारी, सरिता महेंद्र न्यायकरे, सुजीत रामचंद्र येवले, लीना शैलेश गजभिये, सुरेखा देवचंद बिसेन, कौशल शामलाल लिल्हारे, कल्पना निलकंठ लिल्हारे.
४छिपीया : चेतनकुमार भैयालाल बाहेकर, आशाताई योगेश हेमने, सरिता विजय उईके, अस्मिता संतोष उके, गुनिराम तुलसीराम खोटेले, शालू सुनील परतेती, गणेश सुकाजी दोनोडे, आशा निलकमल सांडमारे, कुंता चंद्रभोज बोहरे.
४बनाथर : मेहताब सिताराम पाचे, तुमेश्वरी देवेंद्र पाचे, समुलाबाई प्रदीप पाचे, कमलेश कुमार मरठे, मनुबाई विद्यादास लांजेवार, ममता नेहरू कावरे, अशोक बिहारीलाल बर्वे, सुखदेव रामेश्वर बिसेन, साधना भारतलाल लांजेवार.
४कोचेवाही : पटले मुकेश पुरनलाल (बिनविरोध), सिंगनधुपे डेकचंद लटारू (बिनविरोध), सुकवंती टेककिशोर बाहे, राजकुमार यशवंतराव कुंभलवार, विमला विनोद कामडे, डिलेश्वरी कोमलसिंह परिहार, संजय गुरुदयाल पटले, ज्योतीबाई प्रकाश बागडे, कल्पनाबाई चंद्रमणी कामडे.
४परसवाडा : गोविंदराम कुवरलाल उईके, ममता अनिल वैद्य, निर्मला हेमराज ठाकरे, डेलेंद्र लक्ष्मीचंद हरिणखेडे, रविंद्र कपीलमुनी पटले, चंद्रकला उदेलाल पारधी, जगदीश भरतलाल पारधी, जयवंता गणेश मरकाम, सीमा गोविंद बरेले.
४जिरुटोला : मोहनलाल भैयालाल कागदेउके, सीमा राजू चौधरी, रामलाल आत्माराम उईके, सोनवाने दुर्गाबाई अनिलकुमार (न्यायालयीन प्रकरणामुळे निकाल राखून ठेवण्यात आले आहे.), शामराव रंगराव कावरे, मीराबाई गोपीचंद कंगाली, निलवंताबाई श्रीराम उईके.
४गिरोला : लुकेश जियालाल रहांगडाले, सविता तिलकचंद राऊत, कविता दुर्योधन तुरकर, दिनेश शालीकराम काटेवार (ईश्वर चिठ्ठीने), प्रदीपकुमार लिम्बाजी न्यायकरे, पुष्पाबाई मोरेश्वर अम्बुले, संतोष निलकंठ ठाकरे, सुशिलाबाई अशोक बागडे, जयश्री ओमेंद्रकुमार रहांगडाले.
४सावरी : टेकचंद बेनीराम सिहारे, गौरीशंकर अभिमन डहाट, निरंज़ना गौतम डोंगरे, नरेंद्र संपतराव चिखलोंढे, आशा महेश कुंभरे (बिनविरोध), सितारा शिशुपाल दमाहे (बिनविरोध), ईश्वर बेनीराम पटले, बाबुलाल बसंतराय कटरे, देवकनबाई चुन्नीलाल बिसेन, मोरेश्वरी ओमप्रकाश टेंभरे, अनिताबाई आत्माराम पटले, प्रेमचंद सेवकराम बिसेन, डीलेश्वरी जिवेंद्र पटले.
४कोरणी : चैतराम कुशनलाल पटले, सविता विनोद रामटेके, सिक्की सोमराज तुरकर, संगिता टेकचंद तुरकर, मुकेशकुमार युवराज तुरकर, छन्नुबाई नेतलाल बिसेन, उषाबाई गिरधारी पटले.
४चंगेरा : उर्मिला सुमरत मरस्कोल्हे, आबीद खान हमिदखान, राधेश्याम चीतूलाल देवाधारी (बिनविरोध), पुष्पा श्रीराम ब्रम्हवंशी, साहेबलाल सुखराम बोरकर, तेजनबाई हिरदूलाल बोरकर (बिनविरोध), कांताबाई शिरीषकुमार डाहाट.
४बिरसोला : केशवकुमार शेरक्या नागफासे, सरोजिनी विजय दंदरे, कविता रंजीत दंदरे, कतेलाल कीसन मातरे, प्रिती चंद्रशेखर तुरकर, देवलाल सुदेलाल जमरे, डिलेश्वरी कृष्ण पाचे, सुरवन रेखलाल पाचे, सहेशराम नारायण देवाधारी, नेतलाल रुपचंद मातरे, निरवंतीबाई कृष्णा पाचे.
४बघोली : सुरेंद्र शंकर सोनावाने, बिसराम तीजूलाल पाचे, कांता देवुलाल बिसेन, अनिल लिखिराम माने, सुनिता रामचंद भोंडेकर, अनंदा जियालाल वाडीवा, घनश्याम भेजनलाल तेलासे, ज्ञानेश्वरी नरेंद्र चौधरी (बिनविरोध), निर्मला झनकलाल तेलासे (बिनविरोध).
४कासा : मोहपत टिरक्या खरे, गिताबाई रतीराम माने, सुनिता चैनलाल माने, राजेश साधु जमरे, गिरजाबाई प्रकाश जमरे, चंद्रकली फिरतीलाल चौधरी, दिनेश टिभू मरठे, योगेशकुमार गेंदलाल चौधरी, कौशल ग्यानीराम पाचे.
४काटी : मुन्ना गेंदलाल उईके, अशोक मारुती गोखले, निर्मला गोविंद चौधरी, सुनंदा महेश चौडे, मुलचंद श्यामाचरण देशकर, कुवरबाई कैलाश जमरे, ईश्वरीदास कमेस कावरे, जिराबाई कैलाश पंजरे, रेखा रविंद्र डुंभरे, मुकेशकुमार प्रेमलाल सूर्यवंशी, आसीफ सुभानी शेख, कविता सुरेश सिंगमारे, अमृतलाल श्रावण तुरकर, विजया नरेश राऊत, सपना संजय गडपायले.
४पोवारीटोला : मिनाक्षी रंजीत बारलिंगे, सौ. निर्मला सुनील शिवणकर, सौ. पंचफुला कुंडलीक टेंभुर्णीकर, मोहनलाल रामभाऊ मेंढे, अरविंद हिवराज टेंभुर्णीकर (बिनविरोध), पुष्पा आनंदराव शरणागत, तारकेश्वर नानाजी चौधरी, सुगवंता विनोद शहारे, निर्मला मुलचंद अळमे.
४लोधीटोला (चुटीया) : पगरवार राजाराम सोनुलाल, अनुसया मेथूलाल गावराने, अटरे विक्रम युवराज, कटरे छन्नुबाई दुर्योधन, ठाकरे संजय बंसीलाल, कंसरे दुर्गेश्वरीबाई दुर्गाप्रसाद, अटरे अनुसया शंकरसिंह.
४गर्रा (बु.) : अतुल धर्मा नंदेश्वर, वेणु निलकंठ गावड, धनवंता धनीराम पटले, रमेश धोंडू चौहान, हेमलता मनोज बोरकर, पुन्यश्वर देवचंद बरडे. गोधन पंचम खांडवाहे, डिलेश्वरी पप्पु येडे, महेंद्र कुवरलाल काटेवार, निर्मला रतिराम ठाकरे, सोना जियालाल बोपचे.
४नवरगावकला : गडपायले किशोर जैतराम.

Web Title: So happy gum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.