प्रशिक्षण विमानाचे आतापर्यंत तीन बळी

By Admin | Updated: April 27, 2017 00:55 IST2017-04-27T00:55:33+5:302017-04-27T00:55:33+5:30

गेल्या १० वर्षात शेकडो वैमानिक तयार करणाऱ्या गोंदियाच्या बिरसी येथील प्रशिक्षण विमानांचा १० वर्षातील तिसरा आणि सर्वात भीषण अपघात बुधवारी घडला.

So far three victims of training planes | प्रशिक्षण विमानाचे आतापर्यंत तीन बळी

प्रशिक्षण विमानाचे आतापर्यंत तीन बळी

गोंदिया : गेल्या १० वर्षात शेकडो वैमानिक तयार करणाऱ्या गोंदियाच्या बिरसी येथील प्रशिक्षण विमानांचा १० वर्षातील तिसरा आणि सर्वात भीषण अपघात बुधवारी घडला. यात दोन पायलटला जीव गमवावा लागला. याआधी अडीच वर्षापूर्वी मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात कोसळलेल्या विमानात एका शिकाऊ पायलटने जीव गमविला होता.
देश-विदेशातील विविध विमान कंपन्यांमध्ये पायलट म्हणून सेवारत झालेले अनेक जण बिरसीच्या विमानतळावरूनच शिकून गेले आहेत. राष्ट्रीय विमान उड्डान संस्था (एनएफटीई) या संस्थेमार्फत बिरसीत हे प्रशिक्षण दिले जाते. सोबतच रायबरेली (उत्तरप्रदेश) येथील इंदिरा गांधी उड्डान अकादमीचे शिकाऊ पायलट हिवाळ्यात बिरसी विमानतळावर चार महिन्यांसाठी डेरेदाखल होऊन येथूनच उड्डानाचा सराव करतात. पण अशा पद्धतीने अपघाताचे प्रमाण नगण्यच आहे.
बुधवारी अपघाताचे वृत्त कळताच सर्व शिकाऊ वैमानिकांसह त्यांचे प्रशिक्षकही हादरून गेले होते. हवाई वाहतुकीचा सराव करण्यासाठी सकाळी वेगवेगळ्या दिशेने रवाना झालेल्या सर्व विमानांना लगेच संदेश देऊन माघारी बोलविण्यात आले. दिवसभर बिरसी विमानतळावर तणाव आणि दु:खाचे वातावरण पसरले होते. (जिल्हा प्रतिनिधी)

गुप्तता पाळण्याचा प्रयत्न
सदर अपघाताबद्दल राष्ट्रीय विमान उड्डान संस्थेकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता काही झालेच नाही अशा अविर्भावात गुप्तता पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला.

 

Web Title: So far three victims of training planes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.