सागवान तस्करांचा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला

By Admin | Updated: November 29, 2014 01:40 IST2014-11-29T01:40:18+5:302014-11-29T01:40:18+5:30

धाबेटेकडी सहवनक्षेत्रातील तिडका बिट क्र.४ च्या कक्ष क्र. २७४ मधून सागवान झाड कापण्यात आले.

Sniffer smugglers attacked the forest attendants | सागवान तस्करांचा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला

सागवान तस्करांचा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला

अर्जुनी/मोरगाव : धाबेटेकडी सहवनक्षेत्रातील तिडका बिट क्र.४ च्या कक्ष क्र. २७४ मधून सागवान झाड कापण्यात आले. मोटारसायकलने वाहतूक करुन घरी चिराण करत असताना दोन आरोपींना वनकर्मचाऱ्यांनी पकडले. ही घटना मंगळवारी (दि.२५) रात्री २ वाजता उघडकीस आली. आरोपी सध्या भंडारा कारागृहात आहेत.
प्राप्त माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी आरोपी पितांबर केवळराम लंजे व घनश्याम लहू तुमडाम रा. बोळदे/करडगाव हे शासकीय वनकक्ष क्र.२७४ मध्ये गेले. सागवान झाड कापून त्या लाकडांची मोटारसायकलने वाहतूक केली. व रंधा मशीनच्या सहाय्याने चिराण करीत असल्याचे आढळून आले. वनकर्मचाऱ्यांनी लाकडाच्या कागदपत्रांची मागणी केली. तेव्हा आरोपींनी वनाधिकाऱ्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली व लगेच त्यांचेवर हल्ला केला. शिताफिने बचाव करत वनकर्मचाऱ्यांनी आरोपींना पकडले व त्यांना अटक केली. घटनास्थळावरुन ५ हजार रुपये मुल्याचे २३ नग सागवन चिराण, ५० हजार रुपये किमतीची हिरो डिलक्स मोटारसायकल क्र.एमएच ३१ सी.सी. ७६८४ तसेच ५० हजार रुपये किमतीची रंधा मशीन असे एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २, २६ (१) ई, मुंबई वननियमावली १९४२ चे नियम क्र.६६, ८२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी एस.पी. कंवर यांच्या मार्गदर्शनात वनाधिकारी संतोष थिपे, वनरक्षक ब्राम्हणकर, नागपुरे, राऊत, खोब्रागडे, शहारे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sniffer smugglers attacked the forest attendants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.