सर्पमित्राला सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:58 IST2018-02-21T23:58:22+5:302018-02-21T23:58:34+5:30

शहरातील मध्यभागातील एका घरात शिरलेल्या भारतीय कोब्रा सापाला पकडून जंगलात सोडण्यासाठी नेत असताना सापाने सर्पमित्राला दंश केला.

Snake bite | सर्पमित्राला सर्पदंश

सर्पमित्राला सर्पदंश

ऑनलाईन लोकमत
आमगाव : शहरातील मध्यभागातील एका घरात शिरलेल्या भारतीय कोब्रा सापाला पकडून जंगलात सोडण्यासाठी नेत असताना सापाने सर्पमित्राला दंश केला. यात सर्पमित्र अजय गोकुल शहारे (२६) हा गंभीर जखमी झाला असून त्याला. गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
आमगाव शहराच्या रौनक नगरातील असाटी यांच्या घरात २० फेब्रुवारीला भारतीय कोब्रा नाग निघाला. घरमालकाने सर्पमित्र अजय गोकुल शहारे यांना बोलावून सापाला पकडण्यास सांगितले. अजयने सापाला प्लास्टीक बॅगेत टाकून जंगलात नेत असताना बोरीतील छिद्रातून सापाने डोके काढून अजयला दंश केला. यात तो खाली पडला. नागरिकांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तो मृत्यूशी झुंज देत आहे. सर्पमित्र अजय शहारे यांच्या उपचारासाठी वनविभागाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Snake bite