ऑपरेशन ऑल आऊटने आवळल्या आरोपींच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST2021-09-27T04:31:41+5:302021-09-27T04:31:41+5:30

२५ सप्टेंबर रोजी रात्री व २६ सप्टेंबर रोजी पहाटे शहर पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन मुस्कामनध्ये एका संशयीताला अटक करण्यात आली. ...

The smiles of the accused covered by Operation All Out | ऑपरेशन ऑल आऊटने आवळल्या आरोपींच्या मुसक्या

ऑपरेशन ऑल आऊटने आवळल्या आरोपींच्या मुसक्या

२५ सप्टेंबर रोजी रात्री व २६ सप्टेंबर रोजी पहाटे शहर पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन मुस्कामनध्ये एका संशयीताला अटक करण्यात आली. तसेच ४ पकड वाॅरंट, २० समन्स तामील केले, १२ निगरानी बदमाश, ३ हिस्ट्री शिटर गुन्हेगारांना तपासले, ३ तडीपार, मंदिर, मस्जिद, हॉटेल, लॉज, पुतळे, स्मारक व चोरीच्या संशयित असलेल्या ठिकाणांची पाहणी पोलिसांनी केली. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या ५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये ठाणेदार महेश बनसोडे, सहायक महादेव सीद, सागर पाटील, सहायक घनश्याम थेर, जागेश्वर उईके, छगन विठ्ठले, सुबोध बिसेन, सतीश शेंडे, अरविंद चौधरी, ओमेश्वर मेश्राम, अनिल कोरे, संतोष भेंडारकर, श्याम कोरे व ४० पोलीस कर्मचारी होते.

Web Title: The smiles of the accused covered by Operation All Out