शहरातील सहा ठिकाण विद्युत विभागासाठी रेड झोन
By Admin | Updated: October 5, 2014 23:07 IST2014-10-05T23:07:17+5:302014-10-05T23:07:17+5:30
विद्युत गळती व थकीत विज बिलाची रक्कम या दोन बाबीवर भारनियमन ठरले असते. या दोन पैकी एक बाजू जरी कमी असली तरी भारनियमन सुरू केले जाते. गोंदिया शहरातील आकडा टाकून वीज चोरी

शहरातील सहा ठिकाण विद्युत विभागासाठी रेड झोन
गोंदिया : विद्युत गळती व थकीत विज बिलाची रक्कम या दोन बाबीवर भारनियमन ठरले असते. या दोन पैकी एक बाजू जरी कमी असली तरी भारनियमन सुरू केले जाते. गोंदिया शहरातील आकडा टाकून वीज चोरी करणारे आठ परिसर विद्युत वितरण विभागासाठी रेड झोन आहेत. या परिसरातील वाहीन्यावर बंच केबल बसवून कायमची विद्युत चोरी बंद करण्याचा मानस विद्युत वितरण कंपनीने बांधला आहे.
एकट्या गोंदिया शहरात ३२ हजार विद्युत कनेक्शन घेणारे ग्राहक आहेत. मात्र चोरीची विद्युत वापरून आपला संसार चालविणारे ही हजारोच्या संख्येत आहे. आकडा टाकून विज चोरी करणे, मिटरमध्ये छेडछाड करणे यामुळे शहरातील विद्युत गळतीचे प्रमाण वाढले आहे. सोबतच शहरातील विद्युत ग्राहकांवर दोन कोटी रुपये विद्युत बिलाची रक्कम थकीत असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीला गोंदिया शहरात भारनियमन करणे भाग पडले. गोंदिया शहरातील भीमनगर, सुंदरनगर, पैकनटोली, सिंगलटोली, मेहतर मोहल्ला व गोविंदपूर या सहा परिसरात आकडा टाकून मोठ्या प्रमाणात विज चोरी होत असल्यामुळे येथील विज चोरीचे प्रमाण थांबविण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने वाहिन्यावर बंच केबल बसविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील ३२ हजार ग्राहकांमधून हजारो ग्राहकांवर विद्युत बिल थकीत आहे. विद्युत वितरण कंपनीचे रेड झोन असलेल्या या परिसरातील विद्युत ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने बंच केबल बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
(तालुका प्रतिनिधी)