सहा महिन्यानंतर निघाला सभेचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : २७ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर म्हणजेच आता ६ महिने लोटल्यानंतर नगर परिषदेला सभेसाठी ...

Six months later the meeting began | सहा महिन्यानंतर निघाला सभेचा मुहूर्त

सहा महिन्यानंतर निघाला सभेचा मुहूर्त

Next
ठळक मुद्दे२४ तारखेला सर्वसाधारण सभा : १७ विषयांवर होणार चर्चा, सभेकडे सर्वांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : २७ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर म्हणजेच आता ६ महिने लोटल्यानंतर नगर परिषदेला सभेसाठी मुहूर्त मिळाला आहे. येत्या २४ तारखेला नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली असून १७ विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
२७ जून रोजी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झाली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शिवाय काही महिने असेच निघून गेले. परिणामी ६ महिने लोटल्यानंतर आता येत्या २३ तारखेला नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे.
सहा महिन्यांपासून सभा न झाल्याने नगर परिषदेतील काही महत्त्वाचे विषय पडून राहिले होते व अशा १७ विषयांवर या सभेत चर्चा होणार आहे.
यामध्ये श्रीनगर क्षेत्रातील मराठा बियर बार अन्यत्र स्थानांतरीत करणे किंवा बंद करणे, जुन्या स्लॉटर हाऊससाठी आरक्षीत सिंधी शाळामागील जागेवर विद्यमान आरक्षण वगळणे, जैवविविधता समिती स्थापित करणे,शासनाकडून प्राप्त होणाऱ्या विविध निधी अंतर्गत विविध विकास कामांचा आराखडा तयार करणे, डोंगर तलाव व चावडी तलाव बांधकाम व सौंदर्यीकरण करणे, प्रभाग क्रमांक ४ मधील पाणीटाकीजवळील जागेवर उद्यानाचा विकास करणे,गणेश नगर येथील दूरदर्शन केंद्र इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त भाडे निर्धारण प्रमाणपत्रास मंजुरी देणे व ३ वर्षांपासून भाडे करार नुतनीकरण करणे, इंदिरा गांधी स्टेडियममधील १२०० स्क्वे.फूट जागा सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला ३ वर्षांसाठी भाड्याने देणे तसेच नगर परिषद कार्यालय व शाळांकरिता स्टेशनरी, छपाई व फर्निचर साहित्याची निविदा आमंत्रित करणे आदि विषयांचा समावेश आहे.

स्थायी समितीची सभा २३ तारखेला
२४ तारखेला सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली असतानाच त्याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच २३ तारखेला स्थायी समितीची सभा बोलाविण्यात आली आहे. सभेत, प्रोफाईल बुक छपाईसाठी निधीची तरतूद करणे, वशिला पद्धतीवर सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती प्रदान करणे, कर्मचाऱ्यांचे ऐच्छीक सेवानिवृत्तीबाबत प्राप्त अर्जास मंजुरी, पाणी पुरवठा विभागाचे हातपंप दुरूस्ती, पंपहाऊस पेंटींग व दरवाजे फिटींग करण्यासाठी ई-निविदा आमंत्रित करणे, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन बिल तयार करण्यासाठी संगणीकृत वेतन प्रणाली खरेदीकरिता खर्च कार्योत्तर मजुरी देणे, अध्यक्ष व नगर परिषदेच्या विविध विभागाकरिता संगणक संच व प्रिंटर खरेदीच्या कार्योत्तर मंजुरी तसेच नगर परिषद लेखा संबंधित कार्य करण्यासाठी सी.ए.नियुक्त करणे आदि विषय मांडले जाणार असून चर्चा केली जाईल.

गाळे फेरलिलावांचा विषय सूचित
२४ तारखेला होत असलेल्या सर्वसाधारण सभेत नगर परिषद गाळे फेरलिलावांचा विषय मांडला जाणार असून त्यावर चर्चा होणार आहे. गाळे फेरलिलावांचा हा विषय विषय सूचित असल्याने आता या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाल्यानंतर काय निर्णय होते हे बघायचे आहे. विशेष म्हणजे, गाळ््यांचा फेरलिलाव झाल्यास नगर परिषदेच्या तिजोरीत मात्र मोठी रक्कम येणार यात शंका नाही. नगर परिषद सदस्य बंटी पंचबुद्धे यांनी हा विषय सभेत मांडण्यात यावा यासाठी निवेदन दिले होते व ते यावर विषयावर पाठपुरावा करीत होते.
डुकरांच्या विषयावर होणार चर्चा
शहरात डुकरांचा कहर वाढतच चालला असून शहरवासी त्रस्त झाले आहेत. यावर डुकरांची समस्या सोडविण्याची मागणी जोर धरत आहे. नगर परिषदेने डुकरांना पडकण्यासाठी निविदाही बोलाविल्या होत्या. मात्र त्यासाठी कुणीही पुढे आले नाही. परिणामी शहरातील डुकरांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नगर परिषदेने पुन्हा या सर्वसाधारण सभेत डुकरांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबतचा विषय घेतला आहे.

Web Title: Six months later the meeting began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.