सहा लाखांची दारू व साहित्य जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:48+5:302021-02-05T07:50:48+5:30
तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसून असलेल्या तिरोडा पोलिसांनी प्रजासत्ताकदिनी पाच अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड ...

सहा लाखांची दारू व साहित्य जप्त ()
तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसून असलेल्या तिरोडा पोलिसांनी प्रजासत्ताकदिनी पाच अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड घालून दारू व हातभट्टीचे साहित्य असा पाच लाख ९९ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
प्रजासत्ताकदिनी शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणून पोलिसांनी सकाळी ११ वाजेपासूनच धाडसत्र सुरू केले. यामध्ये, माया श्यामराव बरेकर (रा. संत रविदास वॉर्ड) यांच्या घरातून हातभट्टीची ४५ लीटर दारू, हातभट्टी साहित्य, ९१ प्लॅस्टिक पोत्यात १८२० किलो मोहासडवा असा एक लाख ४५ हजार रुपयांचा माल जप्त केला. ईश्वर मदन बरेकर (रा. संत रविदास वॉर्ड) याच्या घरातून ४० लीटर दारू, हातभट्टी साहित्य व ६२ प्लॅस्टिक पोत्यात १२६० किलो सडवा असा एक लाख ८०० रुपयांचा माल जप्त केला. संतोष फ्लेचंद कनोजे (रा. संत रविदास वॉर्ड) याच्या घरातून ७० लीटर दारू, हातभट्टी साहित्य व ४२ प्लॅस्टिक पोत्यात ८४० किलो सडवा असा ६७ हजार रुपयांचा माल जप्त केला. छाया सोविंदा बरेकर (रा. सिली) यांच्या घरातून ७६ लीटर दारू, हातभट्टी साहित्य व ८९ प्लॅस्टिक पोत्यात १७८० किलो सडवा असा एक लाक ४० हजार रुपयांचा माल जप्त केला, तर संजय सोविंदा बरेकर (रा. सिली) याच्या घरी धाड घालून ९६ लीटर दारू, हातभट्टी साहित्य व ९८ प्लॅस्टिक पोत्यात १८५० किलो सडवा असा एक लाख ४७ हजार रुपयांचा माल अशा प्रकारे एकूण पाच लाख ९९ हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.