न.प.च्या रिंगणात सहा उमेदवार

By Admin | Updated: May 14, 2016 01:47 IST2016-05-14T01:47:45+5:302016-05-14T01:47:45+5:30

शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त पदासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी

Six candidates in the NP rank | न.प.च्या रिंगणात सहा उमेदवार

न.प.च्या रिंगणात सहा उमेदवार

एका उमेदवाराचा अर्ज मागे : आज होणार चिन्ह वाटप
गोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त पदासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात सहा उमेदवार उरले आहेत.
प्रभाग क्रमांक १ मधील ‘ड’ गटातील सदस्य अनिल पांडे यांचा मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेतली जात आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पोटनिवडणूक जाहीर केली. यांतर्गत सात उमेदवारांनी आपले १२ उमेदवारी अर्ज सादर केले होते. तर ३ मे रोजी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीत एकही अर्ज कापल्या गेला नव्हता. त्यामुळे सातही उमेदवार रिंगणात होते.
मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी पद्मकांत चौधरी यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यांचा अर्ज मागे घेण्यात आल्याने आता रिंगणात उर्वरीत सहा उमेदवार उरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या हा अर्ज मागे घेण्यात आल्याने आता निवडणुकीचे चित्र आणखी स्पष्ट झाले आहे. तर शनिवारी उमेदवारांना अर्ज वाटप व उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आहे.

प्रचार कार्य जोमात सुरू
शहरातील फक्त एकाच जागेसाठी होत असलेल्या या पोटनिवडणुकीला घेऊन शहरवासीयांत पूर्वीपासूनच उत्सुकता होती. आता हळूहळू निवडणूक जवळ येत असल्याने राष्ट्रीय पक्षाने तिकीट जाहीर केलेल्या उमेदवारांचे प्रचार कार्यही जोमात सुरू झाल्याचे दिसते. यात राष्ट्रीय पक्षांकडून प्रचार सभाही घेतल्या जात असल्याचे दिसत आहे. याशिवाय अन्य उमेदवारही आपापल्या परीने प्रचार कार्याला लागले आहेत.
हे उरले आता मैदानात
या पोटनिवडणुकीत उमेश मनोहर दमाहे व नागेश्वर राजेश दुबे हे दोघे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर विनायक नत्थू खैरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून, लोकचंद सोमाजी रहांगडाले कॉंग्रेसकडून, दीपक सुधाकर बोबडे शिवसेनाकडून तर राजू विठ्ठलराव पारधी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

Web Title: Six candidates in the NP rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.