बहीण जावयाने केला साळ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST2021-06-03T04:21:07+5:302021-06-03T04:21:07+5:30

अर्जुनी-मोरगाव: पती पत्नीचा पैशावरून वाद सुरू होता. या वादात घाणेरडी शिवीगाळ करणाऱ्या बहीण जावयाला समज देत असताना बहीण जावयाने ...

Sister Javaya committed the murder of Salya | बहीण जावयाने केला साळ्याचा खून

बहीण जावयाने केला साळ्याचा खून

अर्जुनी-मोरगाव: पती पत्नीचा पैशावरून वाद सुरू होता. या वादात घाणेरडी शिवीगाळ करणाऱ्या बहीण जावयाला समज देत असताना बहीण जावयाने आपल्या साळ्याच्या पोटात चाकू भोसकून खून केला. ही घटना १ जून रोजी दुपारी २.३० वाजता अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या प्रतापगड येथे घडली. गवस महम्मद शेख (५१) रा. प्रतापगड असे मृताचे नाव आहे.

गवसची बहीण सलमा हिला गावातच लग्न करून दिले. सलमाचा पती आरोपी कदीर रशीद शेख (४५) रा. प्रतापगड हा आपल्या पत्नीसोबत पैसे दे म्हणून भांडण करीत होता. त्या भांडणाच्यावेळी त्याचा मुलगा आरीफ शेख बाहेरून घरी आला. त्यावेळी त्यानेही वडिलाला तू कशाला पैसे मागतोस, असे बोलला आणि गावातील चौकाकडे निघून गेला. त्यांच्यात वाद सुरूच होता. या वादात आरोपी कदीर जोराजोराने शिवीगाळ करीत असल्याने गवस महम्मद शेख यांनी शिवीगाळ का करतोस, असे म्हटले असता, आरोपी हा अंगणात जाऊन गवसला मारायला लागला. त्याच्या कमरेला खोचून ठेवलेल्या चाकूने गवसच्या पोटात घाव घातले. यात तडफडून गवसचा मृत्यू झाला. कदीर नेहमीच कमरेला चाकू खोचून ठेवत असतो. नाजीया गवस मोहम्मद शेख रा. प्रतापगड यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास संदीप इंगळे करीत आहेत.

Web Title: Sister Javaya committed the murder of Salya