साहेब, आमच्या उपासमारीचा प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:22+5:30

वितभर पोटासाठी आणि पोटाची खडगी भरण्यासाठी माणूस दारोदार भटकंती करतो. असेच काही नागरिक मध्यप्रदेश व कांपाटेंपा येथून आले व कुंभिटोला या संचारबंदीमुळे अडकले आहेत. मात्र आता हाताला काम नाही अशावेळी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे साहेब, आमच्या उपासमारीचा प्रश्न सोडवा ते नागरिक उपाशी राहू नये,म्हणून त्यांना तांदूळ-गहू अन्नधान्य व पैशाची मदत करण्यात आली.

Sir, solve the problem of our hunger | साहेब, आमच्या उपासमारीचा प्रश्न सोडवा

साहेब, आमच्या उपासमारीचा प्रश्न सोडवा

Next
ठळक मुद्देगावकऱ्यांनी केली अन्नधान्याची मदत । रोजगारासाठी आले अन् अडकले

मुन्नाभाई नंदागवळी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : वितभर पोटासाठी आणि पोटाची खडगी भरण्यासाठी माणूस दारोदार भटकंती करतो. असेच काही नागरिक मध्यप्रदेश व कांपाटेंपा येथून आले व कुंभिटोला या संचारबंदीमुळे अडकले आहेत. मात्र आता हाताला काम नाही अशावेळी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे साहेब, आमच्या उपासमारीचा प्रश्न सोडवा ते नागरिक उपाशी राहू नये,म्हणून त्यांना तांदूळ-गहू अन्नधान्य व पैशाची मदत करण्यात आली.
कोहमारा-वडसा या राज्य मार्गावर तसेच गोदिंया-चांदाफोर्ट या रेल्वे मार्गावर कुंभीटोला बाराभाटी हे गाव वसलेले आहे. सदर गाव मुख्य असल्याने या ग्रावात अनेक बाहेरील नागरिक उदरनिर्वाह करण्याच्या हेतूने येत असतात.
मध्यप्रदेशातील गढीगर्दगंज येथील उदयसिंग चव्हाण, सरदार चहाण, मंगल चव्हाण, महेंद्र चव्हाण, जितेंद्र चव्हाण, चारणबाई चव्हाण, सीमा चव्हाण, मिरा चव्हाण, किरण चव्हाण, गुड्डी चव्हाण, गुज्जर चव्हाण, पूजा चव्हाण, ज्योती चव्हाण आदी गाडीलोहार समाजाचे लोक कुदळ, फावडा, कुºहाड, विळा आणि शेती उपयोगी अवजारे तयार करण्याचे काम करणारे स्त्री-पुरुष एकूण १३ नागरिक त्याचप्रमाणे कांपाटेंपा येथील शामराव घोडाम, भाग्यश्री घोडाम व शंतनू घोडाम असे तीन व्यक्ती हे मुळाक्षरे, महापुरुषांचे छायाचित्रे, नकाशे व इतर पोस्टर विकणारे असे संपूर्ण एकूण १६ नागरिक कुंभिटोला येथे संचारबंदी होण्याच्या तीन दिवसांपासून अडकले आहेत. त्यांची दखल घेत पद्मा राठोड व रवी जुगनाके यांनी पुढाकार घेवून त्यांना १ किवंटल गहू, २८ किलो तांदूळ आणि ५०० रुपये देण्यात आले.
यावेळी सरपंच पद्मा राठोड, उपसरपंच रवि जुगनाके, ग्रमसेवक विजय ढोक व शिपाई कर्मचारी पुंडलिक मारगाये उपस्थित होते.

Web Title: Sir, solve the problem of our hunger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.