सिद्धी, वैष्णवी व आर्यन ठरले मानकरी
By Admin | Updated: September 3, 2016 00:02 IST2016-09-03T00:02:13+5:302016-09-03T00:02:13+5:30
लोकमत बाल विकास मंचच्या वतीने बालकांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी गीतगायन स्पर्धा घेतली

सिद्धी, वैष्णवी व आर्यन ठरले मानकरी
एकल व समूह स्पर्धा : आंतरशालेय समूह गीत स्पर्धेत शारदा कॉन्व्हेंट प्रथम, चिमुकल्यांच्या गीतांनी भारावले श्रोते
गोंदिया : लोकमत बाल विकास मंचच्या वतीने बालकांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी गीतगायन स्पर्धा घेतली. यात लहानग्यानी शर्तीने प्रयत्न करून उत्कृष्टरित्या गीतांचे सादरीकरण केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी कनोजिया, द्वितीय वैष्णवी दुबे तर तृतीय क्रमांक आर्यन पारधी याने पटकाविले.
लहानसहान बालकांच्या अंगी असलेल्या वेगवेगळ्या कलागुणांवा वाव व मंच उपलब्ध करून देण्याच्या दिशेने नेहमीच लोकमत वृत्तपत्र अग्रसर राहिला आहे. याच अनुषंगाने लोकमत बाल विकास मंचच्या वतीने वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी सर्वांसाठी उपलब्ध असते. आपल्या मधूर सुरांनी जग जिंकण्याचा उद्देश जपणाऱ्या चिमुकल्या गीतप्रेमींसाठी लोकमत बाल विकास मंचने आंतरशालेय गीत स्पर्धा स्थानिक श्री गणेशन फंक्शन हॉल, गणेशनगर गोंदिया येथे गणेशन कॉन्व्हेंटच्या विशेष सहकार्याने पार पाडले.
सुरांची देवी सरस्वती व स्वातंत्र सेनानी तसेच लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून आंतरशालेय गीतगायन स्पर्धेची सुरूवात करण्यात आली. या वेळी विदर्भ स्टडी सर्कलचे डायरेक्टर त्रिलोक शेंडे, इंदिरा गांधी आयटीआयचे मुख्याध्यापक जोगेंद्र गजभिये, गणेशन कॉन्व्हेंटचे संस्थापक अखिलेश्वर स्वामी, लोकमतचे जाहिरात प्रतिनिधी अतुल कडू प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सत्यम शिवम सुंदरम या मनोरम गीताने विद्यार्थ्यांनी श्रोत्यांचे मन मोहून घेतले. अचूतम केशवम कृष्ण दामोदरम, मेरी मॉ, राधा ही बावरी, केशवा माधवा, अग संगतीनं माझ्या तू येशील का, तुमसे मिलकर ऐसा लगा, तू कितनी अच्छी है, यशोमती मैया से बोले नंद लाला, रंग दे बसंती यासारख्या मधूर गीतांवर विद्यार्थ्यांनी स्वरसाद चढविला. लहानसहान विद्यार्थ्यांच्या मुखातून निघालेल्या सुमधूर गीतांनी श्रोत्यांना चांगलेच भारावून घेतले.
गीतगायन स्पर्धेला परीक्षक म्हणून विनोद शरणागत व सम्राट राजेपांडे उपस्थित होते.
प्रास्ताविक इव्हेंट जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार यांनी मांडले. आभार जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी मानले. संचालन रामभरूस चक्रवर्ती यांनी केले. कार्यक्रमासाठी रौनक उदापुरे, संतोष बिलोने, कमलेश भुजाडे, अनूप कुर्वे यांनी सहकार्य केले. या वेळी श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)