पोषण माह अंतर्गत घेतले सिकलसेल मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST2021-09-18T04:31:32+5:302021-09-18T04:31:32+5:30
मुख्याध्यापक ए. पी. मेश्राम यांच्या अध्यक्षतेत आयोजित शिबिराला वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली गहाणे, आरोग्य परिचारिका सिया शहारे, रक्त तपासणी ...

पोषण माह अंतर्गत घेतले सिकलसेल मार्गदर्शन शिबिर
मुख्याध्यापक ए. पी. मेश्राम यांच्या अध्यक्षतेत आयोजित शिबिराला वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली गहाणे, आरोग्य परिचारिका सिया शहारे, रक्त तपासणी तंत्रज्ञ प्राची पंचभाई, ज्येष्ठ शिक्षक डी. पी. डोंगरवार, आर. जी. पुस्तोडे, पोषण आहार प्रभारी एन. आर. गिरेपुंजे, मल्टी स्किल शिक्षक वाय. वाय. मौदेकर, हेल्थकेअर शिक्षिका प्राची मेंढे, जी. बी. डोंगरवार, डब्लू. एम. परशुरामकर उपस्थित होते. रक्तक्षय व सिकलसेल तपासणीनंतर डॉ. गहाणे यांनी युवतींना आरोग्य विषयक मार्गदर्शन करीत सिकलसेल आजाराबाबत माहिती दिली. मुख्याध्यापक मेश्राम यांनी, आपल्या कोविड-१९ काळात घ्यावयाची दक्षता आणि पाळावयाचे नियम याबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, पोषण माह अंतर्गत विद्यालयात पोषण आहार घोषवाक्य स्पर्धा, शिक्षकांनी गृहभेट घेऊन पालक व विद्यार्थ्यांना कोविडबाबतीत मार्गदर्शन केले तसेच किशोरींची हिमोग्लोबिन तपासणी व ऑनलाइन पद्धतीने योगासने व प्राणायामांचा सराव घेण्यात आला. संचालन करून प्रास्ताविक प्राची मेंढे यांनी मांडले. आभार गिरेपुंजे यांनी मानले.