सहायक निबंधकांना कारणे दाखवा नोटीस (priority)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST2021-01-23T04:30:07+5:302021-01-23T04:30:07+5:30

शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे, शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीची तक्रार करूनही त्यावर ...

Show cause notice to Assistant Registrar Notice (priority) | सहायक निबंधकांना कारणे दाखवा नोटीस (priority)

सहायक निबंधकांना कारणे दाखवा नोटीस (priority)

शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे, शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीची तक्रार करूनही त्यावर चौकशी अहवाल तयार करण्यास दिरंगाई करणे, वरिष्ठांची परवानगी न घेता कार्यालयात अनुपस्थित राहणे, सहकारी संस्थांना चुकीचे मार्गदर्शन करून पैशांची मागणी करणे, मर्जीतील संस्थांच्या हिताचे काम करून त्यांच्यावरील तक्रारी फेटाळून लावणे, खरेदी-विक्री समितीच्या नियमबाह्य बांधकामाला मंजुरी देऊन भ्रष्टाचाराला खतपाणी घालणे असे सात आरोप तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने लावले होते.

याची तक्रार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल व जिल्हा उपनिबंधकांना केली होती. याची तातडीने दखल घेत भानारकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ३ दिवसात मुद्द्यांचा खुलासा करण्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक ( सहकारी संस्था) शुद्धोधन कांबळे यांनी मागितले आहे.

Web Title: Show cause notice to Assistant Registrar Notice (priority)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.