शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसवरील औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

शहरातील खासगी ईएनटी तज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञांकडे दररोज तीन रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या कोसाकोनाला झोल या टॅबलेट आणि एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचासुद्धा शहरातील औषध विक्रेत्यांकडे मागील आठवडाभरापासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन-तीन रुग्णांच्या शस्त्रक्रियादेखील रखडल्याची माहिती आहे. अतिरिक्त पैसे माेजून देखील ही औषधे मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देदररोज सरासरी तीन रुग्णांची नोंद : एम्फोटिसिरीन बी इंजेक्शन मिळेना : औषधे सुद्धा महागडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. जिल्ह्यातसुद्धा या आजाराचा शिरकाव झाला आहे. शहरातील खासगी ईएनटी तज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञांकडे दररोज तीन रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या कोसाकोनाला झोल या टॅबलेट आणि एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचासुद्धा शहरातील औषध विक्रेत्यांकडे मागील आठवडाभरापासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन-तीन रुग्णांच्या शस्त्रक्रियादेखील रखडल्याची माहिती आहे. अतिरिक्त पैसे माेजून देखील ही औषधे मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. शहरातील चार ते पाच मुख्य औषधी दुकानांमध्ये या औषधांची मागणी केली, तसेच यासाठी अतिरिक्त पैसे मोजण्याची तयारी दाखवूनसुद्धा औषधे मिळाली आहेत. त्यामुळे म्युकरमायकोसिसवरील औषधे मिळत नसून, रुग्णांच्या नातेवाइकांची त्यासाठी भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने या औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे येथील औषध विक्रेत्यांनी सांगितले.  कोरोनाच्या संकट काळात  या आजाराने अधिक भर घातल्याने अनेकांची चिंता वाढली आहे.  

मागणी किती, पुरवठा किती?-  सध्या गोंदिया येथे एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनची १५ व २० इंजेक्शनची मागणी होत आहे. मात्र, या इंजेक्शनचा महाराष्ट्रासह इतर राज्यांतसुद्धा तुटवडा असल्याने हे इंजेक्शन मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. शिवाय, कोसाकोनाला झोल या टॅबलेटचासुद्धा तुटवडा निर्माण झाला आहे. एका रुग्णाला लागतात ४५ डोस -  म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, हा आजार प्रामुख्याने नाकावाटे डोळ्यांत आणि डोळ्यांतून मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे आजाराची लक्षणे दिसताच त्वरित उपचार करावा लागतो. गंभीर रुग्णांना बरेचदा १४ दिवसांपर्यंत एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचे जवळपास ४५ डोस द्यावे लागतात. या एका इंजेक्शनची किमत ६ ते ८ हजार रुपये आहे. 

काय म्हणतात तज्ज्ञ काेरोनाच्या पहिल्या लाटेत म्युकरमायकोसिसचे एकही रुग्ण नव्हते. मात्र, दुसऱ्या लाटेत या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मी स्वत: दररोज दोन-तीन रुग्ण तपासत आहे. यात अनेकांना सर्जरी करण्याची गरज पडत आहे. यापूर्वी या आजाराचे वर्षातून एक-दोन रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णांनी लक्षणे दिसताच वेळीच काळजी घेत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा- डॉ. संजय भगत, ईएनटी तज्ज्ञमागील दहा-बारा वर्षांत मी या आजाराचा एकही रुग्ण बघितला नव्हता. मात्र, मागील महिनाभरापासून या आजाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दररोज दोन-तीन रुग्ण तपासणीसाठी क्लिनिकमध्ये येत आहेत. आजाराचा नाकावाटे डोळ्यांपर्यंत शिरकाव होतो. त्यामुळे रुग्णांनी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. -डॉ. नीलेश जैन, नेत्ररोग तज्ज्ञ. कोरोनाबाधित व कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे. स्टेरॉईडचा अतिवापर आणि उपचारादरम्यान आयसीयूमध्ये अधिक काळ असलेल्या रुग्णांना याची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षणे दिसताच वेळीच उपचार केल्यास रुग्ण बरा होतो.                - डॉ. राहुल उईके, ओरल मॅक्सीलो सर्जन.

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या