वादळी वाऱ्यातील नुकसानग्रस्तांना लवकरच भरपाई
By Admin | Updated: March 22, 2017 01:26 IST2017-03-22T01:26:12+5:302017-03-22T01:26:12+5:30
मागील वर्षी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते.

वादळी वाऱ्यातील नुकसानग्रस्तांना लवकरच भरपाई
गोंदिया : मागील वर्षी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. आता लवकरच या नुकसानग्रस्तांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम पांढराबोडी व एकोडी येथे १.५० कोटींच्या विविध विकासकामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. या विकासकामांतर्गत ग्राम पाढराबोडी येथे ६० लाख रूपयांच्या निधीतून विठ्ठल-रूक्मीनी मंदिर- हिवरा मार्ग लोकार्पण, दोन लाख रूपयांच्या निधीतून ग्रामीण सिमेंट रस्ता बांधकाम, ग्राम एकोडी येथे १० लाख रूपयांच्या निधीतून एकोडी-रामपूरी रस्ता डांबरीकरण, १७ लाख रूपयांच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेत दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम, दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत तीन लाख रूपयांच्या निधीतून रस्ता सिमेंटीकरण, तीन लाख रूपयांच्या निधीतून रामपूरी रस्ता सिमेंटीकरण व जिल्हा निधींतर्गत २.५० लाख रूपयांच्या निधीतून रस्ता सिमेंटीकरणाचे भूमीपूजन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेतील कॉंँग्रेस गटनेता रमेश अंबुले, जि.प.सभापती विमल नागपूरे, सदस्य शेखर पटले, भोमराज चुलपार, पं.स.उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, सदस्य हरिचंद कावळे, बंटी भेलावे, निता पटले, विनिता टेंभरे, डिलेश्वरी लिल्हारे, प्रमिला करचाल, चमन बिसेन, माजी जि.प.सदस्य रमेश लिल्हारे, शकुंतला खजरे, माजी सदस्य बंडू शेंडे, मदन लिल्हारे, सरपंच निर्मला सुलाखे, उपसरपंच संजय वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येत अन्य प्रतिनिधी व नागरीक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)