शॉर्ट सर्किटने आग लागून गोठा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:42+5:302021-03-19T04:27:42+5:30
सौंदड : सडक अर्जुनी तालुक्यातील टेमनी (हेटी) येथील टुटीराम बिसेन यांच्या जनावरांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटने आग लागली. मंगळवारी (दि. ...

शॉर्ट सर्किटने आग लागून गोठा खाक
सौंदड : सडक अर्जुनी तालुक्यातील टेमनी (हेटी) येथील टुटीराम बिसेन यांच्या जनावरांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटने आग लागली. मंगळवारी (दि. १६ मार्च) सायंकाळी ५ वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेत गोठ्यातील जनावरांची तणस व लाकूडफाटा जळून खाक झाल्याने बिसेन यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.
मंगळवारी ५ वाजतादरम्यान अचानक शॉर्ट सर्किटने गोठ्याला आग लागली व गोठ्यात ठेवलेल्या तणसाने भडका घेतला. ही आग इतकी भयंकर होती की आग विझविण्यासाठी जवळपास ४ तास लागले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र गोठ्यात जनावरांसाठी ठेवलेले तणस व लाकूडफाटा जळून बिसेन यांचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीची माहिती तलाठी यांना देण्यात आली. त्यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिसेन यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.