धक्दादायक ! जिल्ह्यात तब्बल ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:28+5:302021-03-31T04:29:28+5:30

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढ होत असतानाच मंगळवारी (दि. ३०) तब्बल ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या ...

Shocking! As many as 3 patients died due to corona in the district | धक्दादायक ! जिल्ह्यात तब्बल ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

धक्दादायक ! जिल्ह्यात तब्बल ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढ होत असतानाच मंगळवारी (दि. ३०) तब्बल ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या जिल्ह्याला हेलावून सोडणारी ही घटना असून, यानंतर आता नागरिकांनी अधिकच दक्षतेेने वागण्याची गरज निर्माण झाली आहे. मंगळवारी २७ बाधितांची भर पडली असून, ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, आता कोरोना जिल्ह्यात आपले पाय घट्ट करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मंगळवारी जिल्ह्यात २७ बाधितांची भर पडली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १८, तिरोडा १, आमगाव २, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ५, तर इतर राज्य - जिल्ह्यातील १ रूग्ण आहे. तसेच ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३७, तिरोडा ३, गोरेगाव २, आमगाव ४, सालेकसा २, देवरी २, सडक - अर्जुनी १ व इतर राज्य- जिल्ह्यातील २ रूग्ण आहेत. यानंतर आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १५,९४४ एवढी झाली असून, यातील १५,९३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६७ टक्के, तर व्दिगुणित गती ३८०.२ दिवस नोंदविण्यात आली आहे.

आता जिल्ह्यात ८१७ रुग्ण क्रियाशील असून, यात गोंदिया तालुक्यातील ४२१, तिरोडा ७६, गोरेगाव २५, आमगाव ८०, सालेकसा १५, देवरी ५८, सडक-अर्जुनी ४१, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ८८, तर इतर राज्य- जिल्ह्यातील १३ रूग्ण आहेत. यातील ६५५ रूग्ण घरीच अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३८७, तिरोडा ४९, गोरेगाव २१, आमगाव ५३, सालेकसा १०, देवरी ३७, सडक - अर्जुनी २५, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ६३, तर इतर राज्य- जिल्ह्यातील १० रूग्ण आहेत.

------------------------

आतापर्यंत १९१ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात मंगळवारी ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यातील १०८, तिरोडा २५, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक - अर्जुनी ५, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ११, तर इतर राज्य- जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत. यानंतर जिल्हयातील मृत्यू दर १.२० टक्के नोंदविण्यात आला आहे.

---------------------------

चाचण्या कमी झाल्याने बाधितांची संख्या कमी

सोमवारी होळीमुळे चाचण्या कमी प्रमाणात झाल्या. त्यामुळे बाधितांची संख्या मंगळवारी कमी दिसून आली असल्याची माहिती आहे. मात्र, आता चाचण्या वाढविण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढणार असून, कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. अशात नागरिकांनी कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन करणे हाच एकमेव तोडगा आहे.

Web Title: Shocking! As many as 3 patients died due to corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.