संपामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 05:00 AM2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:22+5:30

बँक कर्मचाऱ्यांनी सुध्दा या संपाला पाठींबा दिला होता. त्यामुळे शासकीय कार्यालयांसह काही बँकामध्ये शुकशुकाट होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने याचा कर्मचारी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला फटका बसला. आयटकच्या नेतृत्त्वात भर पावसात काढण्यात आलेल्या मोर्चात अंगणवाडी सेविका व कामगार मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या.

Shocked in government offices due to the closure | संपामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट

संपामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे आंदोलन : आयटकने काढला पावसात मोर्चा, सर्वच शासकीय विभागाचे कामकाज ठप्प, नागरिकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : संघटित व असंघटित क्षेत्रातील श्रमिक संघटनानी बुधवारी (दि.८) देशव्यापी संपाचा इशारा दिला होता. यात संपात जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा सहभागी झाले होते. बँक कर्मचाऱ्यांनी सुध्दा या संपाला पाठींबा दिला होता. त्यामुळे शासकीय कार्यालयांसह काही बँकामध्ये शुकशुकाट होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने याचा कर्मचारी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला फटका बसला. आयटकच्या नेतृत्त्वात भर पावसात काढण्यात आलेल्या मोर्चात अंगणवाडी सेविका व कामगार मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या.
देशाच्या ११ श्रमिक संघटनांनी ८ जानेवारीला देशव्यापी भारत बंदचा इशारा दिला होता. या अंतर्गत महाराष्टÑ राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात विविध संघटनांनी एकत्र येऊन गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील प्रशासकीय भवनासमोर आंदोलन केले. या आंदोलनात वेगवेगळ्या शासकीय कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधीं व सदस्य सहभागी झाले होते. अनेक वक्त्यांनी शासकीय धोरणांचा विरोध करून शासनाकडून अपेक्षा व्यक्त केली. कर्मचाºयांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घ्यावे, सोबतच मुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात महाराष्टÑ राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य महासचिव लीलाधर पाथोडे, नागपूर विभागाचे सहसचिव आशीष रामटेके, जिल्हाध्यक्ष मदन चुºहे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पी.जी.शहारे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लीलाराम जसुजा, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कमलेश बिसेन, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे सचिव लीलाधर तिबुडे, विदर्भ पटवारी संघाचे अध्यक्ष एम.टी.मलेवार, विजुक्टाचे सचिव ज्योतिक ढाले, महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदचेअध्यक्ष गुणेश्वर फुंडे, राजस्व कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राकेश डोंगरे, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर यांनी पुढाकार घेतला. शासनाकडून सन २००५ ची नवीन पेंशन योजना संपवून जूनी पेंशन योजना लागू करावी व इतर १५ मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पहिल्यांदा विविध बँक कर्मचाºयांनीही या आंदोलनात भाग घेतला होता. परिणामी विविध शासकीय कार्यालय सुरू होते परंतु सर्व कार्यालय रिकामी पडल्याने शुकशुकाट होता. प्रशासकीय भवन,पंचायत समिती, जिल्हा परिषद, सिंचन विभाग, वन विभाग व इतर अनेक विभागाच्या कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे कामकाज ठप्प होते. काही कार्यालयात असलेल्या कंत्राटी कर्मचाºयांच्या आधारावर काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
श्रमिक संघटनेच्यावतीने भारत बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाला पाठींबा देत आयटकच्या नेतृत्त्वात स्थानिक राजलक्ष्मी चौकातून मोर्चा काढण्यात आला.
यात अंगणवाडी सेविका,सहाय्यीका, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा गटप्रवर्तक कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, विद्युत कर्मचारी, हमाल, कामगार, बिडी कामगार, शेतमजूर व घरकामगार सहभागी झाले होते. सोबत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून महागाईवर नियंत्रण, आर्थिक मंदी, नोटबंदी, जीएसटीमुळे रोजगार क्षेत्रात कपात, रोजगार उपलब्ध करविणे व इतर मागण्यांचा निवेदनात समावेश होता. शिष्टमंडळात आयटकचे अध्यक्ष हौसलाल रहांगडाले, सचिव रामचंद पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ राज्य सचिव मिलिंद गणवीर, शकुंतला फटींंग, शालू कुथे, करूणा गणवीर, शेखर कनोजिया, विजय काकडे, विजय चौधरी, अनिल तुमसरे यांचा समावेश होता.

Web Title: Shocked in government offices due to the closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा