पूरपीडितांसाठी शिवणीवासी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 06:00 IST2019-09-17T06:00:00+5:302019-09-17T06:00:12+5:30
जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनेवरून आमगाव तालुक्यातील ग्राम शिवणी येथील शेतकऱ्यांनी तणस व ८०० रूपये वाहतूक खर्च स्वखर्चातून गोळा केले होते. परंतु जिल्हा परिषदेने तणसाचा तो ट्रक भरल्यामुळे पाठवून दिला होता. परिणामी शिवणी येथील शेतकऱ्यांनी पाठविलेला जनावरांचा चारा पूरपिडीत भागातील जनावरांसाठी जाऊ शकला नाही.

पूरपीडितांसाठी शिवणीवासी सरसावले
लोकमत न्यूज नेटवर्क
चिरचाळबांध : यंदा पावसाने राज्यात थैमान घातले. पावसामुळे नाशिक, कोल्हापूर व गडचिरोली जिल्ह्यातील जीवनमान अस्ताव्यस्त झाले. अनेक कुटंब उघड्यावर आले. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवला. ही बाब लक्षात घेत जनावरांच्या चाºयासाठी ग्राम शिवणी येथील शेतकºयांनी एक हजार ४८५ रूपये स्वखर्चातून गोळा करून दिले. सदर निधी मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यासाठी पदमपूर येथील यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडान बहुउद्देशिय विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविला.
महाराष्ट्रातील पूरपिडीतांसाठी ठिकठिकाणाहून मदत करण्यात आली. परंतु जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली म्हणून जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागातर्फे जिल्ह्यातून गोळा करण्यात आलेला चारा (तणस) यापूर्वी पाठविण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनेवरून आमगाव तालुक्यातील ग्राम शिवणी येथील शेतकऱ्यांनी तणस व ८०० रूपये वाहतूक खर्च स्वखर्चातून गोळा केले होते. परंतु जिल्हा परिषदेने तणसाचा तो ट्रक भरल्यामुळे पाठवून दिला होता. परिणामी शिवणी येथील शेतकऱ्यांनी पाठविलेला जनावरांचा चारा पूरपिडीत भागातील जनावरांसाठी जाऊ शकला नाही.
त्या चाºयाला विक्री करून आलेले पैसे व शेतकºयांनी वाहतूक खर्च म्हणून जमा केलेले ८०० रूपये असे एकूण एक हजार ४८५ रूपये एकत्र झाले. अशातच १२ सप्टेंबर रोजी पदमपूर येथील यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडान बहुउद्देशिय विकास संस्थेतर्फे आमगावात मदत रॅली काढण्यात आली. त्या रॅलीची माहिती शिवणीवासीयांना मिळताच त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याजवळ पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी गोळा केलेले एक हजार ४८५ रूपये त्यांच्या दिले. उडान व यशोदा संस्थेने गोळा केलेले व शिवणीवासीयांनी जमा केलेले ते पैसे मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जाणार आहेत.
जनावरांच्या चाऱ्यासाठी शिवणी येथील माजी तंटामुक्त अध्यक्ष जी.के. हत्तीमारे, अशोक गायधने, भक्तराज मटाले, विठोबा मटाले, अमृतला मटाले, महेंद्र मटाले, छोटेलाल रहांगडाले, कृष्णगोपाल भिमटे, निलकंठ भुते, राधेश्याम हत्तीमारे, शामकुमार मेंढे, शंकर मेंढे, धनराज भांडारकर, ओमप्रकाश मटाले, धनलाल मटाले, देवदास मटाले, पोलीस पाटील ओमप्रकाश हत्तीमारे, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेंद्र पटले यांनी पुढाकार घेतला होता.