शिवजयंती रॅलीने अर्जुनी दुमदुमले
By Admin | Updated: March 17, 2017 01:43 IST2017-03-17T01:43:02+5:302017-03-17T01:43:02+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजराने

शिवजयंती रॅलीने अर्जुनी दुमदुमले
सौंदडमध्ये पोवाडा : शिवजयंती वर्षभर साजरी व्हावी-राजकुमार कुथे
अर्जुनी-मोरगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजराने अर्जुनी नगर दुमदुमले. ढोल, ताशे, नगाडे, आतीशबाजी, छत्रपती शिवरायांची आकर्षक झाँकी, अश्वारुढ मावळे, भगवे, तोरण, पताका, शिवसैनिकांच्या हातातील भगवे झेंडे, तरूण, तरुणीनी धारण केलेल्या भगवे फेटे यांनी सारा आसमंत भगवामय वाटत होता. शिवजयंतीनिमित्त निघालेल्या भगव्या रॅलीत आबालवद्ध वाटत होता. शिवजयंतीनिमित्त निघालेल्या भगव्या रॅलीत आबालवृद्धांसह युवक-युवतींनी लाडक्या शिवरायांच्या जन्मदिनाचा जल्लोष केला.
तालुका शिवसेनेच्यावतीने शिवरायांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेष जायस्वाल यांच्या हस्ते मांडवगणे कॉम्पलेक्स येथील सेना कार्यालयात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ध्वजाचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कामगार सेना जिल्हा प्रमुख अरूण मांडवगणे, तालुका प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख अजय पालीवाल, विभाग प्रमुख बबन बडवाईक, होमदास ब्राम्हणकर, राजु बोरीकर, यादोराव कुंभरे, कृष्णा आगाशे, ओमप्रकाशसिंह पवार, सुरेंद्र ठवरे, अजय पशिने, प्रकाश उईके, नगरसेविका ममता पवार उपस्थित होते.
सायंकाळी ५ वाजता शिवरायांची शोभायात्रा काढण्यात आली. मांडवगणे कॉम्प्लेक्स येथून ही शोभायात्रा मार्गक्रमण करीत नगरातील मुख्य मार्गानी दुर्गा चौकात पोहचली. शिवरायांची आकर्षक झांकी, अश्वारुढ मावळे, भगवे झेंडे व तरूणाईच्या जल्लोषाचे नगरवासीयांनी स्वागत केले. हजारोंच्या संख्येने शिवजयंती सोहळ्यात शिवप्रेमीनी हजेरी लावले. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. व्यापारी संघटनेतर्फे शोभायात्रेसाठी सरबत वितरण केले. दुर्गा चौक येथे शोभायात्रेचा समारोप करुन सहभोजनाने कार्यक्रमाचा शेवट झाला. जय भवानी, जय शिवाजीच्या गजराने युवक-युवतींनी नगर दुमदुमून सोडले. कार्यक्रमासाठी रुपेश बाळबुध्दे, अस्मित गौतम, श्रीधर हटवार, प्रजय कोरे, जितेंद्र हातझाडे, चेतन कोरे, राकेश कोडापे, गोलू पशिने, केतन खंडाईत, सुमीत पशिने, गिरीष देशमुख, स्वप्नील खंडाईत, नितेश भोयर, किरण मस्के, अंकीता मांडवगणे, यशश्री क्षिरसागर, शितल वावरे, शुभांग कोरे, सिमरण भरणे, तयतेली खाटोळे, राणी कोहरे, नेहा मांडवगणे, भूमीता वावरे, वैष्णवी वावरे, रश्मी चांदेवार, शुभांगी कोरे, सुनिल मांडवगणे, शामू पशिने, कुलदीप राठौड, लोकेश हुकरे, मोरेश्वर सोंदरकर व शिवप्रेमींनी सहकार्य केले.
सौंदड : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. मात्र छत्रपतींची जयंती फक्त दोनच दिवस नव्हे तर पूर्ण वर्षभर प्रत्येक घरामध्ये साजरी करण्यात यावी, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांनी केले.
येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर उप जिल्हा प्रमुख सुनिल लांजेवार, हर्ष मोदी, पंचायत समिती सदस्य गायत्री इरले, अनिल डोंगरवार, प्रभुदयाल लोहिया, लालचंद खडके, वसंता विठ्ठले, बापू भेंडारकर, अशोक घोषे, प्रकाश तुमाने, प्रदीप कुंभरे, युवराज गोबाडे, धनराज मुंगुलमारे, वाल्मीक पेटकुले, वंदना डोये, विष्णु रोकडे, दुलीचंद पटले, नवज्योत तुमाने उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त गावात रॅली काढण्यात आली होती. तर शिवाजी महाराजांची जनतेमध्ये ओळख पूर्णपणे पटावी याकरीता पोवाड्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तसेच हनुमान मंदिर ते संपूर्ण गावामध्ये रात्रीला मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. संचालन आणि आभार विशाल ब्राम्हणकर यांनी मानले.