देवरी येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा मोर्चा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST2021-02-05T07:46:48+5:302021-02-05T07:46:48+5:30
परसटोलावरून निघालेल्या या मोर्चाचे चिचगड मार्गावरील राणी दुर्गावती चौकात सभेत रूपांतर झाले. तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी शिवसेना जरी ...

देवरी येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा मोर्चा ()
परसटोलावरून निघालेल्या या मोर्चाचे चिचगड मार्गावरील राणी दुर्गावती चौकात सभेत रूपांतर झाले. तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी शिवसेना जरी सत्तेत असली तरी जनतेच्या हिताकरिता सदैव रस्त्यावर उतरेल असे म्हटले तर जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांनी गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांच्या हिताकरिता आंदोलन आम्ही करीत राहू असे सांगितले. शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने आणले तिन्ही कृषी कायदे रद्द करावे या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. शिष्टमंडळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू, तालुकाप्रमुख सुनील मिश्रा, शहरप्रमुख राजा भाटिया, उपतालुकाप्रमुख शंभू घाटा, डालचंद मडावी, विनोद गौर, किसान सेनेचे तालुकाप्रमुख संजय मेहर, प्रचार-प्रसार प्रमुख भूमेश पटले, शहर समन्वयक परवेझ पठाण, नरेश बन्सोड, विभाग प्रमुख गोविंद बन्सोड, माजी उपसभापती गणेश सोनबोईर, प्रकाश सोनबोईर, शिवसैनिक महेश फुन्ने, विलास राऊत, राजा मिश्रा, छन्नू नेवरगडे, संजय भांडारकर यांचा समावेश होता.