गोंदियात देखाव्यांसह शिवजयंती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 00:34 IST2017-03-19T00:34:01+5:302017-03-19T00:34:01+5:30
शिवसेना जिल्हा कार्यालय गांधी प्रतिमाजवळ माजी आमदार रमेश कुथे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेनेचे

गोंदियात देखाव्यांसह शिवजयंती रॅली
गोंदिया : शिवसेना जिल्हा कार्यालय गांधी प्रतिमाजवळ माजी आमदार रमेश कुथे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे, सुनील लांजेवार, नगरसेविका नेहा नायक, तालुकाप्रमुख मुन्ना बहेकार, विद्यार्थी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत ठवकर, वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष रितेश वर्मा, विक्रमसिंह बैस, माजी न.प. उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी, माजी सभापती लता निरज रहांगडाले, दुर्गेश रहांगडाले, प्रशांत कोरे, अमीत अवस्थी, चुन्नी चौरावार, विनोद तामसेटवार, युवराज लिल्हारे, प्रकाश सेवतकर, सोनू चंद्रवंशी, रुपेश (सोनु) कुथे व जिल्ह्यातील शिवसेना, विद्यार्थी सेना, युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक आणि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर शहराच्या प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. यात अनेक प्रकाची देखावे होते. रात्री ८ वाजता जयस्तंभ चौकवर इंदोरच्या प्रख्यात आतिशबाजीचे प्रदर्शन करण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)