शेंड्यात परवान्याची दारू बंद, अवैध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 01:37 IST2016-06-19T01:37:31+5:302016-06-19T01:37:31+5:30

आठ वर्षापासून सुरू असलेली देशी दारूची दुकान अचानक बंद झाल्याने गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

Sheet's license to be stopped, illegal illegal | शेंड्यात परवान्याची दारू बंद, अवैध सुरू

शेंड्यात परवान्याची दारू बंद, अवैध सुरू

शेंडा (कोयलारी) : आठ वर्षापासून सुरू असलेली देशी दारूची दुकान अचानक बंद झाल्याने गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. चौकाचौकात व गल्लीबोळात अवैध दारुचा महापूर वाहत आहे. विक्रेत्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
शेंडा येथे सन २००८ मध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने व काही लोकांच्या सहकार्याने चौकाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवार भिंतीला लागून देशी दारू दुकानाला परवानगी देण्यात आली होती. या दारू दुकानाच्या काही अंतरावर जि.प. शाळा आहे. सतत आठ वर्षांपासून अविरत चालू असलेली दारू दुकान परवाधारक आणि नोकरनामा असलेल्या व्यक्तीच्या वादात ही दुकान १ एप्रिलपासून बंद पडली. याचाच फायदा घेत कमी वेळात अधिक नफा कमावण्याच्या नादात अवैध दारू विक्रेत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.न्यायालयाने. २७ मे रोजी व्ही. साठे यांचे न्यायालयाने परवाना धारकाच्या बाजूने न्याय दिला. परंतु नोकरनामा असलेल्या व्यक्तीने २८ मे च्या रात्रीच जेसीबी ने दारू दुकानाचे घर पाडले. परवाना धारकाने दारू दुकानासाठी दुसरे घर शोधले. तेथे सुद्धा दारू दुकानाला मंजुरी मिळू नये म्हणून दोन चार लोकांना हाताशी धरुन देवरी, आमगाव व गोंदियाच्या वारंवार वाऱ्या करण्यात आल्या. स्वत: समोर न होता दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवणे सुरू असल्याची चर्चा आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली. गावातील पाणी वाहणाऱ्या नाल्या पालापाचोळ्याने भरल्या आहेत. कचरा पेट्या अनेक वर्षापासून तुडुंब भरल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. पथ दिव्याची समस्या आहे. गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुल मिळाले नाही. वृद्धांना नियमित पेंशन मिळते किंवा नाही, बीपीएल, अंत्योदय, एपीएलधारकांना रेशन मिळते किंवा नाही. जीवनावश्यक व मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करुन शेंड्यात दारूसाठी भांडणे होत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Sheet's license to be stopped, illegal illegal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.