‘ती’ हत्या केली पुतण्याने

By Admin | Updated: June 25, 2016 01:38 IST2016-06-25T01:38:00+5:302016-06-25T01:38:00+5:30

जमिनीच्या वादातून दोन भावांमध्ये कडाक्याचे भांडण नेहमीच होत होते. यात मोठ्या भावाने लहान भावाचा काटा काढण्यासाठी आपला मोठा मुलगा ...

She 'killed' with neatness | ‘ती’ हत्या केली पुतण्याने

‘ती’ हत्या केली पुतण्याने

आरोपीला अटक : मात्र तिघे अजूनही मोकाट
परसवाडा : जमिनीच्या वादातून दोन भावांमध्ये कडाक्याचे भांडण नेहमीच होत होते. यात मोठ्या भावाने लहान भावाचा काटा काढण्यासाठी आपला मोठा मुलगा दिनू भोजलाल पटले यास तेजलाल पटले यांची हत्या करण्यास सांगितल्याचे उघड झाले. पोलिसांनी पुतण्या दिनू (२५) याला अटक केली आहे. मात्र इतर आरोपी फरार आहेत.
२२ जूनच्या सायंकाळी ६.४५ च्या सुमारास चार लोकांनी मिळून बेरडीपार-डब्बेटोला पटमैदान रस्त्यावर दगडाने ठेचून हत्या केली. रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून फरार झाले. २३ जून रोजी माहिती मिळताच पोलिसांनी माग काढला. त्यावरुन पुतण्या दिनू पटले (२५) यास पोलिसांनी २३ जून रोजी सकाळी अटक केली. तपास सुरू केला.

Web Title: She 'killed' with neatness