पतीच्या छळापायी तिने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:28 IST2021-04-16T04:28:55+5:302021-04-16T04:28:55+5:30
आमगाव तालुक्याच्या किडंगीपार येथील माहेरी आलेल्या कल्पना महेश कुंभरे (२४) हिने ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता माहेरीच स्वत:च्या ...

पतीच्या छळापायी तिने केली आत्महत्या
आमगाव तालुक्याच्या किडंगीपार येथील माहेरी आलेल्या कल्पना महेश कुंभरे (२४) हिने ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता माहेरीच स्वत:च्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील तीन महिन्यापूर्वी गोरेगाव तालुक्याच्या चिचगाव येथे तिचे लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. नेहमी तिच्यावर पाळत ठेवून ती फोनवर बोलत असताना लपूनछपून ऐकत होता. क्षुल्लक कारणावरून तिच्यासोबत भांडण करीत होता. पतीच्या मानसिक छळाला कंटाळून ती होळीला माहेरी आली. तिने आत्महत्येमागील कारण लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची आई कांता चंद्रभूषण सयाम (४७) रा. किडंगीपार यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी मृताच्या पतीविरुद्ध भादंविच्या कलम ४९८ (अ) ३०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पठाडे करीत आहेत.