दारु दुकानाला तीव्र विरोध
By Admin | Updated: April 9, 2017 00:12 IST2017-04-09T00:12:05+5:302017-04-09T00:12:05+5:30
शासनाने राज्य मार्गावरील सर्व देशी-विदेशी दारु दुकान व बीअरबारला ५०० मीटरच्या आत बंदी केली.

दारु दुकानाला तीव्र विरोध
किडंगीपारची ग्रामसभा वादळी : दारुविक्रेत्याच्या परवानगीवरून रोष
आमगाव : शासनाने राज्य मार्गावरील सर्व देशी-विदेशी दारु दुकान व बीअरबारला ५०० मीटरच्या आत बंदी केली. परंतु किंडगीपार येथील ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी देशी दारु दुकानाला हिरवी झेंडी दिल्याने नागरिक भडकले. परिणामी ७ एप्रिल रोजी आयोजित ग्रामसभेत १९० लोकांनी तीव्र विरोध दर्शवून ग्राम पंचायतला धारेवर धरले.
किंडगीपार येथे देशी दारु सुरु करण्यासाठी एका व्यक्तीने अर्ज केला. यासंदर्भात ग्रामपंचायतने जाहिरनामा काढून १५ ते २२ मार्च दरम्यान आक्षेप मागविण्यात आले होते. परंतु या आक्षेपाची माहिती नागरिकांना नव्हती. त्यामुळे सरपंच व सचिवांनी दारु विक्रेत्याला आक्षेप नाही असा पत्र दिला. परंतु आक्षेप नसल्याचा प्रमाणपत्र देण्यापूर्वी ग्रामसभा घेणे आवश्यक असताना चिरीमीरी घेऊन ग्राम पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी व सचिवाने सदर कृत्य केल्याचे लक्षात आले. त्यामुळे भडकलेल्या नागरिकांनी ग्राम पंचायतला ग्रामसभा घेण्यास प्रवृत्त केले. ७ एप्रिल रोजी आयोजित ग्रामसभेत १९० महिला पुरुषांनी हजेरी लावून या दारु दुकानाला तीव्र विरोध केला. दारु विक्रेत्यांकडून पैसे मागण्यात आल्याची कबूली ग्रामसभेतच देण्यात आली. सरपंचाने चक्क तीन गेट गावासाठी बनवून द्या, अशी मागणी केल्याचे स्वत: सरपंच घनश्याम मेंढे यांनी ग्रामसभेत सांगितले. त्यामुळे आम्हाला गेट नको आमचे कुटूंब दारुमुळे उध्दवस्त करु नका, अशी मागणी करीत महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनावर तासेरे ओढले. गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोहर शिवणकर व सिमा चंद्रीकापुरे यांनी गावकऱ्यांना संबोधीत केल्यामुळे नागरिक दारुबंदीसाठी एकवटले. दारुबंदी समितीच्या अध्यक्ष सुषमा कोरे, उपाध्यक्ष कांत रहिले, सचिव किरण चुटे, प्रमिला खरोेले, सेवंता भांडारकर, गुणवंता पाऊलझगडे, मुक्ता चुटे, अरुणा श्यामकुवर, मनू मेंढे, तारा महारवाडे, सिमा चंद्रीकापुरे, भुरण वाकले, अमृता पुसाम, संगीता मडावी, सरस्वता फाये, मंगला बहेकार, उर्मिला रहिले, फुलन शिवणकर, कारण शिवणकर, लिला रहिले, कमला महारवाडे, पुष्पा मडावी, मनिषा राऊत, पुस्तकला बागडे, कांता मेंढे, मधू मेंढे, शिवलीला पंधरे, गीता गौतम, मुक्ता कोरे, रमेश रहिले, दमयंती रहिले, मीरा चोरवाडे, बयना सयाम, सरीता मेंढे, मनोहर शिवणकर, देवेंद्र भांडारकर, किशोर चुटे, सोमेश्वर हरिणखेडे, लक्ष्मन मुनेश्वर, विनोद कोरे, देवराज मुनेश्वर, जीवन रहिले, गोपाल रहिले, भोजराज भांडारकर व इतर नागरिकांनी ग्रामपंचायतच्या विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करीत दारु दुकान सुरु होणार नाही असा पवित्रा घेतला.
ठाणेदाराला सरपंचाचा सवाल, ‘तुम्ही का आलात?’
दारुबंदीसाठी मार्गदर्शन करा म्हणून महिलांनी ठाणेदार प्रशांत भस्मे यांना बोलावले होते. परंतु ग्रामसभेत तुम्ही का आलात? असा सवाल सरपंच घनश्याम मेंढे यांनी ठाणेदाराला केला. त्यामुळेही नागरिकांचा आक्रोश वाढला. ठाणेदार चांगल्या कामासाठी आले असताना सरपंचानी केलेला सवाल नागरिकांना खटकला. सरपंच दारु विक्रेत्यांला सहकार्य करतात, चिरीमिरीच्या भरोश्यावर नागरिकांची दिशाभूल करून दारु विक्री करण्यासाठी सरपंच तर पुढाकार घेत नाही ना? असा आरोप नागरिकांकडून होत आहे.