सरसकट कर्जमाफीसाठी शरद पवारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 21:45 IST2018-12-23T21:45:22+5:302018-12-23T21:45:58+5:30
गोंदिया व भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल भाव आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

सरसकट कर्जमाफीसाठी शरद पवारांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल भाव आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
खासदार पवार रविवारी (दि.२३) कार्यक्रमानिमित्ताने गोंदिया आले होते. हे निमित्त साधून त्यांच्यासोबत धान उत्पादक जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने माजी आमदार राजेन्द्र जैन, गोंदिया जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, माजी मंत्री अनिल देशमुख, नानाभाऊ पंचबुधे, माजी आमदार दिलीप बंसोड, अनिल बावनकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विजय शिवनकर, नरेश माहेश्वरी, धनंजय दलाल, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रिकापुरे, रमेश तराम, महेश जैन, अशोक गुप्ता, अशोक सहारे, कल्याणी भूरे, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, किशोर तरोणे, केतन तुरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.