तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सावली शाळेने मारली बाजी

By Admin | Updated: November 29, 2014 23:23 IST2014-11-29T23:23:01+5:302014-11-29T23:23:01+5:30

नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटामधून सहभागी झालेल्या ३५ नमुन्यांमधून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा सावलीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

Shaley School wins taluka level science exhibition | तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सावली शाळेने मारली बाजी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सावली शाळेने मारली बाजी

देवरी : नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटामधून सहभागी झालेल्या ३५ नमुन्यांमधून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा सावलीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
सिध्दार्थ हायस्कूल डवकी येथे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन २६ व २७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या प्रदर्शनीत प्राथमिक गटात ३५ शाळेच्या विद्यार्थ्यांना नमुने सादर केले होते. सावली शाळेतील पदवीधर शिक्षक संदीप तिडके यांच्या मार्गदर्शनात इयत्ता सहावीचा विद्यार्थी अतुल चामकाटे याने पायदानावर आधारीत बर्जर हे मॉडेल विज्ञान प्रदर्शनीत सादर केले होते. त्या मॉडेलला प्राथमिक गटामधून प्रथम क्रमांक देण्यात आला. पारितोषक वितरण अध्यक्ष महेंद्र मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील दोन वर्षापासून गावची शाळा आमची शाळा या महत्वाकांक्षी उपक्रमामध्ये जि.प.व प्राथमिक शाळा सावलीला सातत्याने तालुक्यातून दुसरा क्रमांक प्राप्त होत आहे. स्पर्धेतील सातत्य टिकविल्यामुळे सावली शाळेचे कौतुक गटशिक्षणाधिकारी किशोर भांडारकर, शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस. येटरे व केंद्रप्रमुख ए.आर. शेंडे यांन केलेले आहे. विज्ञान प्रदर्शनीतील यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पी.एफ.बागडे, पदवीधर शिक्षक संदीप तिडके, एन.ए. शेंडे, एच.एम.राऊत, रमेश ताराम, यु.बी.कुरसुंगे, रवि वरखडे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अतुल चामलाटे यांचे कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shaley School wins taluka level science exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.