शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पैशांची परतफेड न करणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार, तिघांवर बळजबरीचा गुन्हा

By नरेश रहिले | Updated: August 12, 2023 18:28 IST

सतोना येथील घटना

गोंदिया : उधार उसनवारी घेतलेल्या पैशांची परतफेड न करणाऱ्या एका ४२ वर्षांच्या महिलेवर तीन नराधमांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोंदिया तालुक्यातील सतोना येथे घडली. यासंदर्भात रावणवाडी पोलिसांनी तीन नराधमांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मुलाच्या उपचारांसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये गावातीलच ४२ वर्षांच्या पीडित महिलेने आरोपींकडून उधार उसनवारी पैसे घेतले होते. ते पैसे ती परतफेड करू शकली नाही. त्या मोबदल्यात दोन आरोपी तिच्यावर नेहमीच आळीपाळीने अत्याचार करायचे. आरोपी देवेंद्र उर्फ बंडू नगारची मानकर (५०) व राजू ढिमरू मानकर (४८) दोन्ही रा. सतोना हे सप्टेंबर २०१२ पासून मार्च २०२३ या काळात दोन आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचे. कधी शेतात तर कधी घरी तिला फोन करून बोलवायचे आणि तिच्यावर अतिप्रसंग करायचे. तिने टाळण्याचा प्रयत्न केल्यास तिला फाेनवर आरोपी धमकी द्यायचे.

९ ऑगस्ट रोजी तिला रात्री ८:११ वाजता तिला शेतातील उसाच्या वाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा सर्व प्रकार नेहमी पाहणारा आरोपी अशोक भगळू मरठे (५०) रा. सातोना यानेही तिला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांवर रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (ड), ३७६ (२), (एन), ३५४ (अ), ४५०, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणgondiya-acगोंदियाArrestअटक