उमरीत भीषण पाणीटंचाई, महिलांची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:47+5:302021-04-25T04:28:47+5:30

बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील धादरी-उमरी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागत ...

Severe water shortage in Umari, women's water pipes | उमरीत भीषण पाणीटंचाई, महिलांची पाण्यासाठी पायपीट

उमरीत भीषण पाणीटंचाई, महिलांची पाण्यासाठी पायपीट

बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील धादरी-उमरी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे. जनावरांसाठी सुद्धा पाणी मिळत नसल्याने पशुपालक सुद्धा संकटात आले आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने कसलीच उपाययोजना केली नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

गावातील नळाला पुरेसा पाणी येत नसून गावालगतचा नाला पूर्णतः कोरडा पडला आहे. या प्रकाराकडे संबंधित शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांना सध्या पाणीटंचाईच्या भयंकर संकटाचा सामना करावा लागत आहे. धादरी-उमरी हे एकाच गटग्रामपंचायतमध्ये येणारे दोन गावे आहेत. या दोन्ही गावांच्यामध्ये एक नाला वाहतो. नाल्याच्या एकीकडे धादरी तर दुसरीकडे उमरी हे गाव आहे. उन्हाळाला सुरुवात झाली असून, गावात भीषण पाणीटंचाई आहे. नळ योजनेचे पाणी केवळ पाच ते दहा मिनिटे सुरू राहते. एवढ्याशा पाण्यात गावकऱ्यांचे दैनंदिन कार्य पूर्ण होत नाही. पिण्याचे पाणी कुठून आणणार अशी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच जनावरांसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

......

पाण्यासाठी जेसीबीने खड्डे तयार करण्याचे काम

दोन्ही गावांच्यामध्ये असलेला नाला पूर्णतः कोरडा पडला आहे. त्यात पाणी नसल्यामुळे आता जेसीबीने नाल्याच्या पात्रात खोदकाम करून पाण्याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले असून काही खड्ड्यांना पाणी लागले आहे. ते पाणी आता गावकरी घेऊन जात आहेत. असे दूषित पाणी वापरण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे.

ग्राम धादरी-उमरीच्या ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळू शकेल व त्यांची पाणी टंचाईची समस्या मार्गी लावावेत, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

..............

समस्येवर उपाययोजना नाही

तिरोडा तालुक्यातील उमरी-धादरी या गावात दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकडे स्थानिक प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.

Web Title: Severe water shortage in Umari, women's water pipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.