अर्जुनीत पाण्याची भीषण टंचाई
By Admin | Updated: March 6, 2016 01:37 IST2016-03-06T01:37:33+5:302016-03-06T01:37:33+5:30
गोंदिया तालुक्यातील अर्जुनी ग्राम येथे भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची वेळ आली आहे.

अर्जुनीत पाण्याची भीषण टंचाई
२२ विहिरी कोरड्या : पाणीपुरवठा योजना झाली ठप्पविजेंद्र मेश्राम ल्ल खातिया
गोंदिया तालुक्यातील अर्जुनी ग्राम येथे भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची वेळ आली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गावातील २२ विहीरी आटून गेल्या आहेत. उन्हाळ्याला जेमतेम सुरूवात झाली असताना ही स्थिती आहे तर पुढे काय होणार? अशी चिंता गावकऱ्यांना सतावत आहे.
गावात ६५००० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. २६ फेब्रुवारीला ११ महिन्याचे ६६ हजार रुपयांचे विद्युत बिल थकबाकी असल्यामुळे टाकीचे कनेक्शन काढण्यात आले. त्यामुळे आता २६ फेब्रुवारीपासून लोकांना पाणी टाकीच्या माध्यमातून पाणी मिळत नाही. यामुळे गावकरी पाण्यासाठी त्राही-त्राही होत आहेत. आपल्या या समस्येचे त्वरीत निराकरण करण्याची मागणी अर्जुनीच्या गावकऱ्यांनी केली आहे. काही ग्रामीण लोकांच्या म्हणण्यानुसार जवळील परिसरातील शेतांमध्ये करण्यात आलेल्या बोअरमुळे गावातील विहीरींची भूजल पातळी खालावली आहे.
ही समस्या क्षेत्रातील जि.प.सदस्य विजय सोनारे यांना सांगितल्यानंतर त्यांनी ४ मार्चला स्वत: येऊन यांनी गावातील भिषण पाण्याची समस्या जाणून घेतली. सुकलेल्या विहीरी पाहिल्या. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपुरे, उपसरपंच सूरजलाल खोटेले उपस्थित होते. या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पाण्याची समस्या त्वरीत निकाली काढली नाही तर भारतीय कॉम्युनिष्ट पार्टीतर्फे ११ मार्चपासून उपोषणाला बसण्याचा इशारा नरेंद्र गजभिये यांनी दिला.