जनावरांचे सात ट्रक पकडले
By Admin | Updated: November 18, 2014 22:59 IST2014-11-18T22:59:18+5:302014-11-18T22:59:18+5:30
कत्तलखाण्यात जाणाऱ्या जनावरांचे सात ट्रक तिरोडा पोलिसांनी पकडले. ही कारवाई सोमवारच्या सकाळी ६ वाजता दरम्यान बिर्सीफाटा येथे करण्यात आली. या सात ट्रकांमध्ये १३८ जनावरे वाहून नेत होते.

जनावरांचे सात ट्रक पकडले
१३८ जनावरांची सुटका : ३० लाखांचा माल जप्त
गोंदिया : कत्तलखाण्यात जाणाऱ्या जनावरांचे सात ट्रक तिरोडा पोलिसांनी पकडले. ही कारवाई सोमवारच्या सकाळी ६ वाजता दरम्यान बिर्सीफाटा येथे करण्यात आली. या सात ट्रकांमध्ये १३८ जनावरे वाहून नेत होते.
ट्रक एम.एच.३१/डी.एस.३२५१ मध्ये १८ बैल वाहून नेतांना चालक मोहसीन नशीम शेख (२१) रा. कामठी याला अटक करण्यात आली. एम.एच.३५/के १४१ मध्ये २२ जनावरे घेऊन जाताना आरिफ अली मोहम्मद अली सैय्यद (३४) रा. फुलचूर याला अटक करण्यात आली. एम.एच.३५/३८५८ मध्ये २१ जनावरे घेऊन जाताना मनोज लखुलाल वट्टी (३५) रा. चिपोटा चिचगड, वाहक मजहर कमाल बेग (१९) रा. चंगेरा, मितेश परसराम पटले (२१) रा. चिरेखनी यांना अटक करण्यात आली. सी.जी.०४ जी ५०२६ मध्ये १९ जनावरे वाहून नेतांना चालक राजकुमार मंगल पाचे १(३७) रा. किरणापूर बालाघाट व वाहक सोहेल रियाज खान (१९) रा. चंगेरा यांना अटक करण्यात आली. एमएच ४९/७७८६ मध्ये २० जनावरे वाहून नेत असताना जावेद जबर अब्दुल (२४) रा. अकोला याला अटक करण्यात आली. एमएच ४० एच २६२७ मध्ये १८ जनावरे वाहून नेतांना आम्रपाल दामोदर गणवीर (२७) रा. कामठी व वाहक शाहरूख रियाज खान (२०) रा. चंगेरा यांना अटक केली. एमएच ३५/१६२१ मध्ये २० जनावरे वाहून नेत असताना सन्नी मोहम्मद ईस्माईल शेख (५०) रा. कटंगी याला अटक करण्यात आली. या सातही कारवाईत एकूण १३८ जनावरे जप्त करण्यात आले.
त्या जनावरांची किंमत १० लाख २५ हजार रूपये तर ट्रकची किंमत २४ हजार ७५ हजार रूपये सांगितली जाते. या प्रकरणात ३५ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई परीवेक्षाधिन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुंभार व त्यांच्या चमूने केली. या प्रकरणातील आरोपींविरूध्द प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुराना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील रेंगेपार येथील गौशाळेत पाठविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)