शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

चोरीच्या प्रकरणात सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:31 IST

कुडवाच्या शिवाजी नगरातील धर्मेंद्र धन्नालाल बन्सोड (३९) यांच्या घरुन ३ जूनला चोरी करणाऱ्या सात जणांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून १ लाख ७९ हजार ३२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई २९, ३० व ३१ जुलै रोजी करण्यात आली.

ठळक मुद्दे१ लाख ८० हजाराचा माल जप्त : रामनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कुडवाच्या शिवाजी नगरातील धर्मेंद्र धन्नालाल बन्सोड (३९) यांच्या घरुन ३ जूनला चोरी करणाऱ्या सात जणांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून १ लाख ७९ हजार ३२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई २९, ३० व ३१ जुलै रोजी करण्यात आली.बन्सोड कुटुंबीय लग्नसभारंभासाठी धामणगाव येथे असताना ईश्वर उर्फ मनिष प्रकाश भालाधरे (२६) रा.आंबेडकर चौक कुडवा, सिद्धार्थ तेजराम बागडे (३३) रा.आंबेडकर चौक कुडवा, प्रविण उर्फ लक्की मेश्राम (१९) रा.आंबेडकर चौक कुडवा, राहूल दिनेशसिंह बरेले (२१) रा.कॉलेजटोली कुडवा, रामकिसन बारकू तिवाडे (३५) रा.खैरलांजी जि.भंडारा, शैलेश बळीराम फुंडे (३१) रा.बाम्हणी बोरकन्हार ता. आमगाव, प्र्रवेश उर्फ छोटू नरेंद्र मेश्राम (२०) रा.आंबेडकर चौक कुडवा यांना संशयावरुन अटक करण्यात आली आहे.त्यांची ५ दिवसाची पोलीस कोठडी घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी सदर गुन्ह्याची कबूली दिली.या प्रकरणातील दोन आरोपींना कुडवा येथून तर उर्वरित आरोपींना तुमसर येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात २३१० रुपयाचा एक डोरला, १४ हजार १४ रुपये किमतीचे लटकन, ४ हजार ३४२ रुपयाचे कानातील सोन्याचे बटन टॉप्स, ३ हजार ६३४ रुपयाचे सोन्याचे दोन टॉप्स, १ हजार ५४० रुपयाचे दोन नग सोन्याचे रिंग, १ हजार ५८९ रुपये किमतीचे एक पायल, ३१ हजार १५ रुपये किमतीची एक सोन्याची साखळी, ११ हजार ७७४ रुपयाचे सोन्याचे पदक, ११ हजार ५८० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, १० हजार ७१८ किमतीची सोन्याची पाचाली, २ हजार ६६५ रुपये किमतीचा चांदीचा कमरबंद, ५ हजार १५० रुपये किमतीचे चांदीचे पायल, ३२४ रुपये किमतीचा चांदीचा आकडा,४४७ रुपये किमतीचा एक कडा, ५१७ रुपये किमतीचे चांदीचे जोडवे, ६४३ रुपयाचा चांदीच्या बिछया,६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, १६ हजार ७६० रुपये रोख व इतर साहित्य असा एकूण १ लाख ७९ हजार ३२ रुपयाचा माल जप्त करण्यात आला.न्यायालयाच्या आदेशाने धमेंद्र धन्नालाल बन्सोड (३९) यांना सदर मुद्देमाल परत करण्यात आला.पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासमोर बन्सोड यांना दागिने सोपविण्यात आले.सदर कारवाई पोलीस हवालदार नामदेव बनकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुंभार, दारासिंग पटेल,राजकुमार खोटेले, धनंजय बडवाईक, शाम राठोड यांनी केली.

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर