रस्त्यात अडवून लुटणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 26, 2017 00:37 IST2017-04-26T00:37:25+5:302017-04-26T00:37:25+5:30
भिवापूर येथील आपल्या गावाला मोटारसायकलने जाताना सात जणांनी त्यांची मोटारसायकल अडवून ...

रस्त्यात अडवून लुटणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल
गोंदिया : भिवापूर येथील आपल्या गावाला मोटारसायकलने जाताना सात जणांनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांच्याजवळून १६ हजार ५०० रूपयाचे साहित्य व रोख रक्कम लुटले. ही घटना ६ एप्रिल रोजी कुंभारेनगराच्या ढाकणी रस्त्यावर घडली. मात्र पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
तिरोडा तालुक्याच्या भिवापूर येथील श्यामकुमार तेजराम कोबडे (३२) हे मोटारसायकलने जात असताना आरोपी अरूण वासुदेव तिडके (२५) रा.रेल्वे चौकी मूर्री व इतर आरोपींनी त्यांच्या जवळचे दोन मोबाईल ३ हजार ५०० रूपये रोख व इतर साहित्य असा एकूण १६ हजार ५०० रूपयांचा माल हिसकावून नेले.
या संदर्भात आनंद राजेश नागपुरे (१९) रा. चंद्रशेखर वार्ड गोंदिया, अरूण वासूदेव तिडके (२५) रा. रेल्वे चौकी मूर्री, लाल पहाडी जवळ मूर्री येथील करण पंजाबराव बोकडे (२५), सागर मितारम टेंभेकर (१९), रितेश रोहीदास गणवीर (१९), नंगपूरा मूर्री येथील बंटी संजय बोमचेर (१९) व राकेश नरेंद्र हुमने (२०) या सात जणांवर कलम ३९५, ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.