शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
4
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
5
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
6
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
7
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
8
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
9
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
10
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
11
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
12
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
13
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
14
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
15
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
16
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
17
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
18
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
19
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
20
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

पाणी वापर संस्थांची स्थापना रेंगाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:46 IST

‘हे धरण आपले, या तलावातील पाणी आपले’ ही जाण शेतकऱ्यांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशातून पाटबंधारे विभागाने पाणी वापर संस्था स्थापन करण्याचा कायदा सन २००५ मध्ये पारित केला. या कायद्यानुसार, जिल्ह्यातील बाघ प्रकल्पांतर्गत सालेकसा, आमगाव व गोंदिया या तीन लाभार्थी तालुक्यांत ६५ पाणी वापर संस्था स्थापन करावयाच्या आहेत.

ठळक मुद्दे६५ संस्थांच्या स्थापनेचे टार्गेट : फक्त १० संस्थांचीच नोंदणी

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘हे धरण आपले, या तलावातील पाणी आपले’ ही जाण शेतकऱ्यांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशातून पाटबंधारे विभागाने पाणी वापर संस्था स्थापन करण्याचा कायदा सन २००५ मध्ये पारित केला. या कायद्यानुसार, जिल्ह्यातील बाघ प्रकल्पांतर्गत सालेकसा, आमगाव व गोंदिया या तीन लाभार्थी तालुक्यांत ६५ पाणी वापर संस्था स्थापन करावयाच्या आहेत. मागील वर्षभरापासून या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असतानाच मात्र अद्याप या प्रकल्पांतर्गत फक्त १० संस्थांचीच नोंदणी झाली असून उर्वरीतांसाठी कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. एकंदर संस्था स्थापनेचे काम रेंगाळत असल्याचेच दिसून येत आहे.जिल्ह्यात बाघ व इटियाडोह हे दोन मोठे व महत्वाचे प्रकल्प असून यांच्या भरवशावरच जिल्ह्याला पिण्याचे व सिंचनासाठीचे पाणी उपलब्ध होते. जिल्हा धानाचा कोठार असला तरिही येथील शेती आजही वरथेंबी पावसावरच अवलंबून आहे. पावसाने दगा दिल्यास या प्रकल्पांतूनच शेतीला सिंचन केले जाते.यात पूर्वी शेतकºयांना सिंचनासाठी पाणी दिले जात होते. त्यानंतर सहकार कायद्यांतर्गत पाणी वापर संस्था स्थापना करण्याचा कायदा आला. तर आता पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी २००५ मध्ये नवा कायदा लागू करण्यात आला. या कायद्यानुसार शेतकऱ्यांना पाणी देण्यापेक्षा पाणी वापर संस्था स्थापन करून त्यांना पाणी पुरवायचे आहे.या नव्या कायद्याची टप्याटप्याने अंमलबजावणी केली जात असतानाच गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात सिचंनासाठी पाणी देणाºया इटियाडोह प्रकल्पांतर्गत १०९ लाभार्थी गावांत ५५ पाणी वापर संस्थांची स्थापना करावयाची होती व ती करण्यात आली आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २१, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात १४ व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा व आरमोरी तालुक्यात २० अशा एकूण ५५ पाणी वापर संस्थांची स्थापना करण्यात आली आहे.त्यानंतर आता बाघ प्रकल्पाची पाळी असून जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील २०, आमगाव तालुक्यातील २३ व गोंदिया तालुक्यातील २२ अशा एकूण ६५ संस्थांची स्थापना या तीन तालुक्यातील १६५ लाभार्थी गावांत करावयाची आहे. असे असताना मात्र आतापर्यंत फक्त १० संस्थांचीच नोंदणी झाली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, पूर्वी सहकार कायद्यांतर्गत पाणी वापर संस्था तयार करायच्या होत्या. त्यात ३४ संस्थांची नोंदणी झाली होती व ८ संस्था कार्यान्वीत होत्या. त्यानंतर २००५ चा कायदा आल्याने आता या संस्थांचे हस्तांतरण व स्थापनेचे काम सुरू आहे. येथे सहकार कायद्यांतर्गत जिल्हा उपनिबंधकांकडे संस्था नोंदणी करावी लागत होती. मात्र नव्या कायद्यानुसार आता पाटबंधारे विभागाकडेच संस्थांची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.कर्मचाऱ्यांची कमतरता व शेतकऱ्यांची उदासिनतालोकेच्छा, लोकसहभाग, लोकवर्गणी व लोक सहकार्य या चतु:सुत्रीचा वापर करून पाणी वापर संस्थांची स्थापना करायवाची आहे. येथे मात्र पाणी वापर संस्थांच्या स्थापनेत शेतकऱ्यांची उदासिनता दिसून येत नाही. परिणामी पाणी वापर संस्थांच्या स्थापनेत अडचण येत आहे. शिवाय पाटबंधारे विभागातील कर्मचाºयांची कमतरता यामुळेही या कामात अडचण येत आहे. कर्मचाऱ्यांकडे त्यांची कामे असतानाच त्यातून वेळ काढून ही कामे करावी लागत आहे. परिणामी या कामाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचेही म्हणणे वावगे ठरणार नाही.संस्थांसाठी असे आहेत फायदेपाणी वापर संस्था स्थापन केल्याने लाभधारकांना पाण्याचा हक्क व मालकी मिळते, खात्रीलायक व वेळेवर तसेच पुरेसा पाणीपुरवठा होतो, मायनर मधून पाणी उचलून घेता येते, पीक रचनेचे स्वातंत्र्य मिळते, संस्थेतर्फे शेतचारीची देखभाल केली जाते व त्यामुळे शेताच्या लाभधारकांना पाण्याची खात्री व पुरेसा पुरवठा होऊ शकतो, आपसातील वाद संस्थेतर्फे स्थानीक पातळीवरच मिटविता येतात, शासनातर्फे सोयी, सवलती, अनुदान व मार्गदर्शन प्राप्त होते, अडचणीच्या वेळी एक किंवा दोन पाणी लागणार असल्यास संस्थेमुळे घेता येते, संस्थेला तीन पट दंडाची आकारणी केली जात नाही, संस्थेंतर्गत पाणी पट्टी दर ठरविण्याचे अधिकार संस्थेकडे असतात, मंजूर पाणी कोटा घेऊन संस्थेला साठविता येते.