३३ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 01:34 IST2016-04-28T01:34:40+5:302016-04-28T01:34:40+5:30

यावर्षी युवा कुणबी संघटनेद्वारे कुणबी समाजाचा ३३ वा सामूहिक विवाह सोहळा रविवारी हिंदी टाऊन शाळेच्या पटांगणात पार पडला.

Setting the 33rd Mass Marriage Festival | ३३ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची सांगता

३३ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची सांगता

युवा कुणबी समाज संघटन : रमेश कुथे यांच्या मार्गदर्शनात ३३ वर्षांची परंपरा
ंगोंदिया : यावर्षी युवा कुणबी संघटनेद्वारे कुणबी समाजाचा ३३ वा सामूहिक विवाह सोहळा रविवारी हिंदी टाऊन शाळेच्या पटांगणात पार पडला. ३३ वर्षापासून चालत येणारा हा विवाह सोहळा पुढेही चालत राहणार आहे. याप्रसंगी मीरा बेदर व बेदरे यांनी लग्न संस्कार व सप्तपदीची प्रथा पार पाडली. परंपरेनुसार नारायण बहेकार यांच्या वाणीतून मंगलाष्टकांसोबत कार्यक्रम झाले.
बँड वाजा व पटाख्यांच्या आतिशबाजीने वरात शहराच्या मुख्य मार्गाने शिवसेना कार्यालयासमोर हिंदी टाऊन शाळेत विवाहस्थळी आली. कुणबी संघटनेचे महिला-पुरूष कार्यकर्ते व वधू पक्षांद्वारे वर व सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज व वीर राजे चिमणा बहादूर गोविंद बहेकार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी युवा कुणबी संघटनेचे अध्यक्ष रमेश कुथे, दूध संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे, निलकंठराव ब्राह्मणकर, लिलाधर पाथोडे, बी.आर. दिवाळे, दुलिचंदराव बुद्धे, डॉ. प्रकाश धोटे, विजय बहेकार, राजेश चतुर, अमर वऱ्हाडे, सी.के. ठाकरे, शैलेश फुंडे, मोहन बुढेकार, गणेश हेमणे, सुनिता तरोणे, सविता भुरले, नंदा राऊत, अभियंता महारवाडे, महादेव मेंढे, एन.के. नखाते, आनंदराव वाढई, चंदनलाल ठाकूर, बंडू चामट, आठवले, चुन्नी बेंदरे, मोरेश्वर कुथे उपस्थित होते. या वेळी वर-वधूंच्या पालकांचा सत्कार रमेश कुथे यांच्याद्वारे करण्यात आले.
मंडप डेकोरेशन व वर-वधू पक्षाच्या पाहुण्यांची थांबण्याची व जेवणाची व्यवस्था, नास्ता, छाछ, आईस गोला, पॉपकार्न व शीतल जलाची व्यवस्था रमेश कुथे कुटुंबीयांकडून नि:शुल्क करण्यात आली. युवा कुणबी संघटनेकडून वर-वधूंना लग्न प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले. संजय भेंडारकर यांनी सर्व नवदाम्पत्यांना स्टँड फॅन भेट दिले.
सदर सामूहिक विवाह सोहळ्यात जळगाव ते गोंदियापर्यंत तसेच छत्तीसगडचे दुर्ग व मध्य प्रदेशाचे लामता, रजेगाव, बालाघाट जिल्ह्यातील नवदाम्पत्यांचा समावेश होता. समाजाला एकजुट करण्याच्या हेतूने व समाजाला अकारण खर्चातून वाचविण्यासाठी रमेश कुथे यांच्या नेतृत्वात ३३ वर्षांपासून या शुभमंगल सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम आहे.
संचालन गजेंद्र फुंडे यांनी केले. आभार राजकुमार कुथे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशांत ठवकर, हिमांशू कुथे, दिनेश बहेकार, मुन्ना बहेकार, कैलाश तावाडे, हेतराम हेमणे, सुधीर बागडे, गजेंद्र बांते, स्वप्नील ढबाले, रमेश देशमुख, भूषण फुंडे, रूपेश निंबार्ते, महेश हलमारे, टिकेश बोहरे, सदु पारधी, प्रकाश बुरडे, संतोष मुनेश्वर, डॉ. विवेक मेंढे, प्रल्हाद सार्वे, शैलेश अहिरकर, प्रकाश पाथोडे, लखन मेंढे, निखिल भांडारकर, जी.आय. फुंडे, सुनील देशमुख, मनिष कुकडे, महेंद्र देशमुख, बंशीधर शहारे, सुखदेव तावाडे, चंद्रकांत चुटे, अ‍ॅड. अजय फेंडारकर, प्रशांत कोरे, नितीन फुंडे, राकेश हत्तीमारे, राजू तावाडे, राजू ठाकरे, सुहास झाडे, निलेश बहेकार, मंगेश बुढेकर, महेश वैद्य, नामदेव रहिले, छोटू पंचबुद्धे, चंद्रकांत तरोणे, पडोल यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Setting the 33rd Mass Marriage Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.