अपंग व्यक्तीची सेवा ही खरी ईश्वरसेवा
By Admin | Updated: November 15, 2014 01:50 IST2014-11-15T01:50:29+5:302014-11-15T01:50:29+5:30
शरीराने अपंग असलेल्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरण्याचा पूर्ण अधिकार आहे. अपंग व्यक्तीला समाजाने सहकार्याच्या व मदतीच्या भावनेने बघितले पाहिजे.

अपंग व्यक्तीची सेवा ही खरी ईश्वरसेवा
गोंदिया : शरीराने अपंग असलेल्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरण्याचा पूर्ण अधिकार आहे. अपंग व्यक्तीला समाजाने सहकार्याच्या व मदतीच्या भावनेने बघितले पाहिजे. अपंग व्यक्तीची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य प्रशासन, जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद व संकल्प बहुउद्देशिय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित अपंग व्यक्तीच्या नुकत्याच आयोजित अतिविशेषोपचार शस्त्रक्रिया शिबिरात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. शिबिराला मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे, उपवनसंरक्षक डॉ. रामगावकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आ. गोपालदास अग्रवाल यांंनीही शिबिराला भेट दिली.
पुढे बोलताना डॉ. अमित सैनी यांनी सांगितले की, अपंगत्व हा आजार नाही. अपंगत्वामुळे अपंग व्यक्तीकडे समाजातील लोकांनी हीनभावना ठेवू नये. म्हणजे त्याला अपंगत्वाची जाणीव होणार नाही. शिबिरामध्ये भूलतज्ञ डॉ. अझहर खान, डॉ. अनुश्री बाहेकर, डॉ. सुगंध, अस्थीरोगतज्ञ डॉ. मनोज राऊत, डॉ. लोकेश खतवार, डॉ. भार्गव गुल्हाने यांनी सहकार्य केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. किमतकर व त्यांच्या चमूने १२ अपंग शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या. अपंग व्यक्तीची शस्त्रक्रिया शिबिर साहित्याकरिता मोजमाप करुन डॉ. सजल मित्रा व अस्थिरोग विभागप्रमुख यांनी ९ अपंग व्यक्तीची निवड केली. शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर, प्रस्तावित मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, डॉ. सजल मिश्रा, डॉ. सतिश जायस्वाल, डॉ. अशोक चौरसिया, डॉ. विनोद वाघमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राज वाघमारे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल परियाल, डॉ. जी.एल. दुधे उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. पंकज पटले, डॉ. स्रेहा वंजारी, सांख्यिकी सहायक निशांत बन्सोड, अनिरुद्ध शर्मा, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक अजितसिंग, पवन वासनिक, विजय ठोकणे, अनू नांदणे, रंजिता सयाम, फुलझेले, धुर्वे, निर्मला चौधरी, इंदिरा पटले, आसमा नागरगोजे, भावना सोलंकी, श्रीमती जिवणे, श्रीमती कोटावार, पारधी, येल्ले, फड, शैलेष टेंभरे, जितेंद्र पारधी, सचिन लोखंडे, रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)