आरोग्य सेवेत सेवाभाव आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 01:10 IST2017-04-11T01:10:05+5:302017-04-11T01:10:05+5:30

डॉक्टर पूर्ण मनाने रूग्णांची सेवा करणार तेव्हाच आरोग्य सेवा रूग्णालय स्थापनेचे उद्द्ीष्ट साध्य होणार आहे.

Service needs in health care | आरोग्य सेवेत सेवाभाव आवश्यक

आरोग्य सेवेत सेवाभाव आवश्यक

गोपालदास अग्रवाल : रजेगाव ग्रामीण रूग्णालयाचा दौरा
गोंदिया : डॉक्टर पूर्ण मनाने रूग्णांची सेवा करणार तेव्हाच आरोग्य सेवा रूग्णालय स्थापनेचे उद्द्ीष्ट साध्य होणार आहे. सर्व रूग्णांना उत्तम सुविधा ग्रामीण रूग्णालयात मिळायला हवी. कारण आरोग्य सेवेत सेवाभाव आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम रजेगाव येथे स्थापित ग्रामीण रूग्णालयाच्या दौऱ्यात उपस्थित डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांसोबत ते बोलत होते. रूग्णालयातील कार्यप्रणाली व डॉक्टरांच्या अनुपस्थितीला घेऊन प्राप्त तक्रारींची शहानिशा करण्यातसाठी आमदार अग्रवाल यांनी रूग्णालयाचा दौरा केला. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, डॉक्टरांचे पहले कर्तव्य रूग्णांना त्यांच्य त्रासातून मुक्त करणे आहे. त्यामुळे भविष्यात डॉक्टरांच्या अनुपस्थिती व दुर्व्यवहाराला घेऊन तक्रार आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच रूग्णालयातील कार्यप्रणालीत सुधार आणण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांना निर्देश दिले.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चौरागडे, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. आशा अग्रवाल, डॉ. चिलपार, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, सरपंच उपवंशी, उपसरपंच बोरकर, हरिविठ्ठल ठाकरे, जाकीर खान, माजी जि.प.सदस्य देवेंद्र मानकर, पवन तेलासे, राजेश माने, बाजार समिती संचालक आनंद तुरकर, काटीचे सरपंच अमृत तुरकर, कॉंग्रेस कमिटी जिल्हा सचिव गेंदलाल शरणागत व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Service needs in health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.