दुसऱ्यांना रोजगाराच्या संधी दाखविणारा स्वत:च बेरोजगार

By Admin | Updated: June 16, 2016 02:22 IST2016-06-16T02:22:22+5:302016-06-16T02:22:22+5:30

तिरोडा येथील बेरोजगारांना मार्गदर्शन व शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारा अरूण उपाशे यांच्या छोटेखानी दुकानावर नगर परिषदेने अतिक्रमण करून जमीनदोस्त केले.

Selfless unemployed showing employment opportunities to others | दुसऱ्यांना रोजगाराच्या संधी दाखविणारा स्वत:च बेरोजगार

दुसऱ्यांना रोजगाराच्या संधी दाखविणारा स्वत:च बेरोजगार

अतिक्रमणाचा विळखा : १० वर्षांपूर्वी घर अन् आता दुकानही जमीनदोस्त
गोंदिया : तिरोडा येथील बेरोजगारांना मार्गदर्शन व शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारा अरूण उपाशे यांच्या छोटेखानी दुकानावर नगर परिषदेने अतिक्रमण करून जमीनदोस्त केले. त्यामुळे दुसऱ्यांना रोजगाराच्या संधी दाखविणारा स्वत:च आता बेरोजगार झाला आहे.
तिरोडा येथील महात्मा फुले वार्डातील रहिवासी अरूण रामचंद्र उपाशे यांनी एम.ए.बी.एड.पर्यंत उच्च शिक्षण घेतले. मात्र रोजगार मिळत नसल्याने त्यांनी तिरोडा पोलीस ठाण्याजवळ सन २००५ मध्ये सांई रोजगार समाचार नावाचे छोटेखानी दुकान टाकले. त्यात ते तिरोडा तालुक्यातील बेरोजगारांना सर्वप्रकारचे नोकरीविषयक मार्गदर्शन करीत होते. त्यांच्यामुळे प्रथमच तिरोड्यातील बेरोजगारांना रोजगार साप्ताहिक, मासिक पत्रिका व इतर स्पर्धाविषयक पुस्तके उपलब्ध होवू लागली.
तसेच सर्वच प्रकारचे आॅनलाईन फॉर्म, पोलीस भरती, सीआरपीएफ, बीएसएफ, सैन्य भरती, एमपीएससी, यूपीएससी, एनडीए व इतर फार्म स्वस्त दरात भरून देतात व बेरोजगारांना मार्गदर्शन करतात. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा शहर व ग्रामीण भागातील असंख्य बेरोजगारांना शासकीय नोकरी मिळालेली आहे. मात्र त्यांचा छोटेखानी व्यवसाय सुरळीत चालला असतानाच आता अतिक्रमणाचे ग्रहण लागले.
तिरोडा नगर परिषदेने १५ जून २०१६ रोजी अतिक्रमणाची कारवाई करून त्यांची छोटेखानी दुकान जमीनदोस्त केली. अशा परिस्थितीत अरूण यांना आता दुसरा पर्याय उरला नाही. त्यांचे वडील सैनिक सेवेतून सेवानिवृत्त होवून स्वर्गवासी झाले. आईचेसुद्धा निधन झाले. अशा परिस्थितीत तो स्वत: आता अनाथ झाला आहे. यापूर्वी सन २००६ मध्ये तिरोडा बस स्थानकाजवळील त्यांचे राहते घर न्यायालयाने जमीनदोस्त करून ताब्यात घेतले होते. अशाप्रकारे त्यांच्यावर सतत अन्याय होत आहे. त्यांनी आपल्या छोटेखानी दुकानासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी न्यायाची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन केली आहे.

Web Title: Selfless unemployed showing employment opportunities to others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.