राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड

By Admin | Updated: November 7, 2015 01:51 IST2015-11-07T01:51:14+5:302015-11-07T01:51:14+5:30

जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रामनगर....

The selection of the state team for the national tournament | राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड

राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड

शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा : राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल जाहीर
गोंदिया : जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रामनगर नगर परिषद शाळा गोंदिया येथे राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून व निवड चाचणीच्या माध्यमातून राष्ट्रीय स्पर्धेकरिता खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
१४ वर्षे वयोगटाखालील विजयी संघ मिलेनियम नॅशनल स्कूल पुणे, उपविजयी संघ विठामाता विद्यालय कराड जि. सातारा, तृती क्रमांक जिल्हा परिषद शाळा टाका ता. अंबड, जि. जालना यांचा समावेश आहे. तर १७ वर्षे वयोगटाखाली मुलींचा विजयी संघ सेकंडरी स्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज भिलवडी जि. सांगली, उपजिवयी संघ विद्या प्रतिष्ठान मराठी शाळा बारामती जिल्हा पुणे, तृतीय क्रमांक निकेतन माध्यमिक विद्यालय नागपूरचा समावेश आहे. तसेच १९ वर्षे वयोगटाखालील मुलींचा विजयी संघ सेकंडरी स्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज भिलवडी जि. सांगली, उपविजयी संघ नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कळमेश्वर जि. नागपूर, तृतीय क्रमांक सी.डी. जैन कॉमर्स कॉलेज श्रीरामपूर जि. अहमदनगर यांचा समावेश आहे.
प्राविण्यप्राप्त संघांना जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांच्या हस्ते ट्रॉफी व पदक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, साहेबराव ठाकरे, अजित पाटील, एस.ए. वहाब प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी क्रीडा कार्यालयाचे अनिल निमगडे, नाजूक उईके, अरूणा गंधे, डी.एस. भारसाकळे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

निवड झालेल्या १४ वर्षे वयोगटातील मुली
राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेसाठी १४ वर्षे वयोगटातील निवड झालेल्या मुलींमध्ये अंजली संदीप कदम (पुणे विभाग), समिक्षा उमेश झगडे (पुणे), कल्याणी संजय परेकर (कोल्हापूर), क्षितिजा दादासो थोरात (कोल्हापूर), सृष्टी रंजित पंडित (पुणे), समृद्धी संदीप देशपांडे (पुणे), युगधरा संजय देशमुख (लातुर), जान्हवी केदार ताम्हणकर (पुणे), आरती नथुराम पानसकर (कोल्हापूर), शुभांगी प्रकाश भोयर (नागपूर), सिद्धी शंतनू गुरव (पुणे) व ऋतुजा गोविंद जायभावे (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. तसेच राखीव मुलींमध्ये संचारी सुनील भोवते (नागपूर), विश्मया मिलिंद पायगुळे (पुणे), श्रद्धा गिरीश सावळ (पुणे), देवांशी विवेकराव हिवसे (नागपूर) व शीतल राजेंद्र पाडवी (नाशिक) यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या १७ वर्षे वयोगटातील मुली
मयुरी बाळासाहेब जगताप (पुणे विभाग), रेणुका भरत देसाई (कोल्हापूर), गायत्री गजानन मोहिते (कोल्हापूर), वैष्णवी भरत बारगुळे (पुणे), पूजा पुष्पकुमार कमावत (कोल्हापूर), अमृता देवदत्त उटगी (पुणे), संध्या तानाजी सपकाळ (पुणे), श्रृती लक्ष्मण मासाळे (पुणे), तनवी सुधाकर नानोटे (अमरावती), पूजा मनोहर कोळी (कोल्हापूर), दिशा अशोक नरडे (कोल्हापूर), नेहा पराग पुरकर (नाशिक) यांचा समावेश आहे. तर राखीव मुलींमध्ये सायली सुरेश वाटुळकर (नागपूर), धनश्री राजेंद्र पाटील (कोल्हापूर), ईश्वरी गोरख शिंदे (पुणे), धनश्री काळे (नागपूर) व मयुरी संजय जमजार (नागपूर) यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या १९ वर्षे वयोगटातील मुली
यात प्रज्ञा संभाजी वरेकर (कोल्हापूर विभाग), ऋतुजा प्रसन्न बलदोटा (पुणे), नेहा हेमंत शिंदे (कोल्हापूर), खुशबू ज्ञानेश्वर मेश्राम (नागपूर), ऋतुजा दिलीप कदम (कोल्हापूर), मानसी पवार (पुणे), वैष्णवी डोबळे (नागपूर), स्मिता बोनकिले (अमरावती), एश्वर्या येनवळे (कोल्हापूर), पूजा पवार (कोल्हापूर), दामिनी पाटील (अमरावती), श्वेता सेलघरे (नागपूर) यांचा समावेश आहे. तर राखीवमध्ये संस्कृती कासारलेवार (नागपूर), ज्ञानंदा इनामदार (कोल्हापूर), कल्याणी भोळे (कोल्हापूर), सुचिता नेवारे (नागपूर) व तारिणी जयंत मोरे (मुंबई) यांचा समावेश आहे.

Web Title: The selection of the state team for the national tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.