न.प.सभापतींची निवड १६ रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 21:25 IST2018-02-04T21:24:24+5:302018-02-04T21:25:00+5:30

Selection of the nominees will be held on 16th | न.प.सभापतींची निवड १६ रोजी

न.प.सभापतींची निवड १६ रोजी

ठळक मुद्देविशेष सभेचे आयोजन : पदांसाठी सेटिंग सुरू

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : नगर परिषदेच्या विषय समित्यांचे गठन करून सभापतींची निवड करण्यासाठी नगर परिषदेने १६ तारखेला विशेष सभेचे आयोजन केले आहे. यंदा नवख्यांसह मागील कार्यकाळात सभापतींचे पद न मिळालेल्यांना संधी देण्यात आली होती. आता मात्र कुणाला हे पद दिले जाते हे पक्ष ठरविणार असून पद आपल्याला मिळावे यासाठी आतापासूनच सेटींग सुरू असल्याचे समजते.
नगर परिषद सभापतींचा कार्यकाळ येत्या १६ तारखेला संपत आहे. त्यामुळे विषय समित्यांचे गठन करून सभापतींची निवड १६ तारखेलाच केली जाणार आहे. यासाठी नगर परिषद सदस्यांची विशेष सभा १६ तारखेला दुपारी २ वाजता बोलाविण्यात आली आहे. पिठासीन अधिकारी म्हणून उप विभागीय अधिकारी अनंत वालस्कर राहतील. या सभेत नगर परिषदेतील बांधकाम समिती, पाणी पुरवठा समिती, महिला व बाल कल्याण समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, नियोजन समिती व शिक्षण समितींचे गठन करून सभापतींची निवड केली जाईल.
नगर परिषदेतील बांधकाम समिती सभापतीपदासाठी सर्वांचीच इच्छा असते. विशेष म्हणजे, या पदाला घेऊन सदस्यांत नाराजी व वादविवाद झाल्याचेही नगर परिषदेत बघावयास मिळाले आहे. हे पद आपल्यालाच मिळावे यासाठी सदस्य पक्षातील वरिष्ठांकडे सेटींग करीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र पक्षाकडून कुणाच्या नावाला हिरवी झेंडी मिळते हे १६ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
सभापतींच्या निवडणुकीसाठी १६ तारखेलाच सकाळी १० ते दुपारी १२ वाजतापर्यंत विषय समिती सभापतीपदासाठी अर्ज मुख्याधिकाºयांकडे सादर करावयाचे आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता सभेत विषय समित्यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन केले जाईल. दुपारी २.१५ वाजतापर्यंत नामनिर्देशन पत्रांची छाननी करून उमेदवारांचे नाव वाचून दाखविले जाणार आहे. तर २.३० वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतर लगेच निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी वाचून आवश्यकता असल्यास निवडणूक घेतली जाईल. तर विषय समिती सभापतींची निवडणूक झाल्यानंतर लगेच स्थायी समितीचे गठन केले जाणार आहे.

Web Title: Selection of the nominees will be held on 16th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.