नगर परिषद बघतेय मुख्याधिकाऱ्यांची वाट
By Admin | Updated: May 19, 2016 01:31 IST2016-05-19T01:31:57+5:302016-05-19T01:31:57+5:30
नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांचे निलबंन झाल्याने सध्या पालिकेचा कारभार अप्पर तहसीलदार बघत आहेत.

नगर परिषद बघतेय मुख्याधिकाऱ्यांची वाट
गोंदिया : नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांचे निलबंन झाल्याने सध्या पालिकेचा कारभार अप्पर तहसीलदार बघत आहेत. मात्र त्यांचीही कामे असताना पालिकेचा अतिरीक्त कारभार देण्यात आल्याने त्यांची पंचाईत होत आहे. याचा प्रभाव कामांवर पडत असून पालिक ा नवीन मुख्याधिकाऱ्यांची वाट बघत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकी अंतर्गत मतदार यादीत घोळ आढळून आला होता. यात भारतीय जनता पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल क रण्यात आली होती. मतदार यादीतील घोळ लक्षात घेत उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य निवडणूक आयोगाने मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांना जबाबदार ठरवीत निलंबीत केले होते. १ एप्रिल रोजी वाहूरवाघ यांना निलंबीत करण्याचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे नगर परिषदेचा प्रभार सध्या अप्पर तहसीलदार के.डी.मेश्राम यांच्याकडे सोपविण्यात आला असून ते मुख्याधिकारी म्हणून पालिकेचा कारभार बघत आहेत.
मेश्राम नगर परिषदेचा कारभार बघत असले तरीही त्यांच्या विभागातील त्यांचीही कामे आहेत. अशात त्यांच्याकडे नगर परिषदेचा अतिरीक्त प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे मेश्राम यांना नगर परिषदेत काही वेळ तर त्यांच्या कार्यालयात काही वेळ असे करून कारभार चालवावा लागत आहे. यात मात्र त्यांची फसगत होत असून कोठे ना कोठे याचा कामांवरही प्रभाव पडत आहे. त्यात प्रभाग क्रमांक १ ची पोटनिवडणूक आल्याने पूर्ण वेळ द्यावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)