रेतीचा ट्रॅक्टर पकडला, १०,४०० रुपयांचा दंड

By Admin | Updated: April 14, 2017 01:43 IST2017-04-14T01:43:41+5:302017-04-14T01:43:41+5:30

परिसरामध्ये होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा बसावा व शासकीय महसुलात वाढ व्हावी या उद्देशाने बोंडगावदेवी

Sector tractor seized, 10,400 rupees fine | रेतीचा ट्रॅक्टर पकडला, १०,४०० रुपयांचा दंड

रेतीचा ट्रॅक्टर पकडला, १०,४०० रुपयांचा दंड

 अर्जुनी-मोरगाव : परिसरामध्ये होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा बसावा व शासकीय महसुलात वाढ व्हावी या उद्देशाने बोंडगावदेवी येथील तलाठी एम.एन.टेभुर्णीकर यांनी बुधवारी (दि.१२) सकाळी ८ वाजतादरम्यान मुख्य चौकामध्ये विनापरवाना रेती नेत असलेला ट्रॅक्टर पकडला. त्याला १० हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बोंडगावदेवी येथील मुख्य चौकामधून भरधाव जाणारा ट्रॅक्टर (एमएच ३६/ एल-३६४७) दिघोरी/मोठी येथील असल्याचे सांगितले जाते.
या ट्रॅक्टर मालकांवर अवैधपणे गौण खनिजांची वाहतुक केल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून १० हजार ४०० रु. दंडात्मक वसूल करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sector tractor seized, 10,400 rupees fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.