पतसंस्थेच्या आमसभेतून सचिवाने केले पलायन?

By Admin | Updated: September 24, 2015 02:20 IST2015-09-24T02:20:07+5:302015-09-24T02:20:07+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेची आमसभा २० सप्टेंबर रोजी मयूर लॉन कटंगी येथे दिलीप खोटेले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

Secretary of the Parliament passed away from the credit union? | पतसंस्थेच्या आमसभेतून सचिवाने केले पलायन?

पतसंस्थेच्या आमसभेतून सचिवाने केले पलायन?


गोंदिया : जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेची आमसभा २० सप्टेंबर रोजी मयूर लॉन कटंगी येथे दिलीप खोटेले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात सत्ताधारी संचालक मंडळाने मनमर्जी कारभार व जवळपास दीड कोटींचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी चर्चा न करता अवघ्या १५ मिनिटातच आमसभा गुंडाळली व सचिवासह पलायन केल्याचा आरोप विरोधकांनी केला.
प्राप्त माहितीनुसार, वर्षाअखेर ३२ कोटी १३ लाख ६१ हजार ६१६ रूपयांचे कर्ज सभासदांकडे बाकी दाखविण्यात आले. मात्र सदर कर्ज वसुलीसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. याबाबत माहिती आमसभेत देण्यात आली नाही. सोसायटीचे सचिव संजय बनकर यांनी संचालक मंडळाची कोणतीही मंजुरी न घेता जलयुक्त शिवायअंतर्गत दोन लाख ४० हजार रूपये नियमबाह्य खर्च केले. गरज नसतानाही अडीच लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे व कार्यालयावर खर्चासाठी मोघम स्वरूपात तीन लाख रूपये खर्च केले. आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये संस्थेला झालेला निव्वळ नफा ६८ लाख ८६ हजार ४४६ रूपयांचा नियमानुसार विनियोग केलेला नाही, असाही विरोधकांचा आरोप आहे.
मनमर्जीने कामकाज सुरू आहे. प्रत्यक्ष जमा-खर्चाची माहिती मागणी करूनही संचालकांना दाखविली जात नाही, असा आरोप करीत संचालकांनी आमसभा पुन्हा घेण्यात यावी व सहकार खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
विषयसूचीवरील विषय वाचून दाखविल्यानंतर आणि त्याला सभासदांची आवाजी मतदानाने मंजुरी मिळाल्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपविली. आर्थिक घोळाचे आरोप चुकीचे व निराधार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे ४७ हजारांचेच झाले. १ कोटी ३९ लाख रुपये भंडारा जि.प. पतसंस्थेतून विभाजन झाल्यानंतर त्यांना देण्यासाठी ठेवले आहेत. आतापर्यंत प्रकरण न्यायप्रविष्ठ होते.
- संजय बनकर
सचिव, जि.प.-पं.स. कर्मचारी सहकारी पतसंस्था, गोंदिया

Web Title: Secretary of the Parliament passed away from the credit union?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.