लोकमत न्यूज नेटवर्कमुरदोली : भरधाव वेगात स्कॉर्र्पिओची काळीपिवळीला धडक लागून घडलेल्या अपघातात काळीपिवळीतील प्रवासी मजूर जखमी झाले. येथील बसस्थानक समोर रात्री ९ वाजतादरम्यान हा अपघात झाला.गोंदियाकडून काळीपिवळी क्रमांक एमएच ३५-२५७६ येथील बसस्थानकावर पोहचली असता विरूद्ध दिशेने आलेल्या स्कॉर्पिओ क्रमांक एमएच ३१-सीआर १३४७ काळीपिवळीला जबर धडक दिली. या अपघातात काळीपिवळीत बसलेल्या पाटेकुर्रा येथील १० हमालांपैकी काहींना किरकोळ मार लागला. तसेच काळीपिवळीच्या वाहकाच्या बख्याला मार लागल्याने त्यांना गोंदियाच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले. यात हमाल चुनीलाल शोबिलाल पारधी यांचा हात तुटला तर गंगाराम बिरीजलाल कटरे यांच्या पायाची कटोरी घसरल्याची माहिती आहे.कोहमाराकडून येत असलेल्या स्कॉर्पिआमध्ये फक्त चालक होता व दारूच्या नशेत तो गाडी गाडी चालवित असल्याने गाडीवर नियंत्रण सुटून ही धडक झाली. विशेष म्हणजे, स्कॉर्पिओमध्ये दारूची बॉटल, पाणी व डिस्पोजेबल ग्लास होता. धडक झाल्यानंतर स्कॉर्पिओ चालक गाडी सोडून पसार झाला. पोलीस पाटील दिलीप मेश्राम,रोशन कटरे, शेखर बुरेवार, मोहन मडावी, पिलारे व गावकऱ्यांनी जखमींना रूग्णालयात पाठविण्यासाठी सहकार्य केले.
स्कॉर्पिओची काळीपिवळीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:07 IST
भरधाव वेगात स्कॉर्र्पिओची काळीपिवळीला धडक लागून घडलेल्या अपघातात काळीपिवळीतील प्रवासी मजूर जखमी झाले. येथील बसस्थानक समोर रात्री ९ वाजतादरम्यान हा अपघात झाला.
स्कॉर्पिओची काळीपिवळीला धडक
ठळक मुद्देबसस्थानक येथील घटना : काळीपिवळीतील मजूर जखमी