शाळा ही व्यवसाय नसून माणूस घडविण्याचे साधन आहे
By Admin | Updated: September 25, 2014 23:26 IST2014-09-25T23:26:59+5:302014-09-25T23:26:59+5:30
सद्यस्थितीत शाळांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शाळांमधून सुजाण पिढी घडविण्याचे महानकार्य केले जाते. शाळा हा धंदा करण्यासाठी नाही. नैतिक मुल्ये, सुसंस्कार, रुजविण्याचे कार्य

शाळा ही व्यवसाय नसून माणूस घडविण्याचे साधन आहे
गाणार : शिक्षण परिषदेचा तालुकास्तरीय मेळावा
अर्जुनी/मोरगाव : सद्यस्थितीत शाळांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शाळांमधून सुजाण पिढी घडविण्याचे महानकार्य केले जाते. शाळा हा धंदा करण्यासाठी नाही. नैतिक मुल्ये, सुसंस्कार, रुजविण्याचे कार्य शाळांतून शिक्षक उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. दुसरीकडे मोफत व सक्तीचे शिक्षण देणारे शासन शुल्क निर्धारणाबाबत सभागृहात चर्चा करीत आहे, असे प्रतिपादन आ.नागोराव गाणार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका अर्जुनी/मोरगाव तर्फे स्थानिक पंचायत समिती बचत भवन येथे आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उमेश कापगते तर विशेष अतिथी म्हणून आ.राजकुमार बडोले, डॉ.उल्हास फडके, राजाभाऊ तेलपांडे, सतिश मंत्री, लिलेश्वर बोरकर, गुणेश्वर फुंडे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.एस. कापगते, कैलाश कुरंजेकर, हेमंत राजगिरे, ओमप्रकाशसिंह पवार, एम.के. जांभुळकर, कृष्णा देशमुख आदि उपस्थित होते.
गाणार पुढे म्हणाले, शैक्षणिक विकासोबतच शिक्षण व शिक्षकांचे हित जोपासणे माझे कर्तव्य आहे. ते मी जोपासणारच, प्रयत्न केल्याने वेतनेवर अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला. शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीतील ग्रेड वेतनाचा प्रश्न, अंशदायी पेंशन योजना ही राष्ट्रीय पेंशन योजनेत रुपांतरीत करण्याची समस्या, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व वेतन सुरक्षा यासंबंधाने पाठपुरावा केल्यानंतरचा प्रश्न मार्गी लागला. शिक्षक आमदार निधीतून ज्या शाळांना काही शैक्षणिक साहित्य मिळाले नाही त्यांनी म.रा. शिक्षक परिषदेमार्फत मागणी केल्यास पुर्तता करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओमप्रकाशसिंह पवार, संचालन के.डी. देशमुख यांनी केले. एम.के. जांभुळकर यांनी आभार मानले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रमेश मस्के, अशोक लंजे, राघोर्ते, जयप्रकाश करंजेकर, दुर्वास मस्के, शंभूनाथ मुरकुटे, बी.के. मस्के, बी.एस. जांभुळकर, विरेंद्र राणे, किशोर शंभरकर, भागवत बडोले, सोयाम, दिगंबर सोमवंशी, आर.के. बाळबुद्धे, गुलवास जांभुळकर, हिरालाल घोरमोडे व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
(तालुका प्रतिनिधी)