अमराईटोला शाळा झाली डिजीटल

By Admin | Updated: May 14, 2016 01:50 IST2016-05-14T01:50:08+5:302016-05-14T01:50:08+5:30

आमगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम अमराईटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजीटल झाली असून शाळेचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला.

The school was digitized by Amariteo | अमराईटोला शाळा झाली डिजीटल

अमराईटोला शाळा झाली डिजीटल

उद्घाटन सोहळा : क्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती
बोरकन्हार : आमगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम अमराईटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजीटल झाली असून शाळेचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला.
जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेत आयोजीत या कार्यक्रमात शाळेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सभापती सविता पुराम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. दीप प्रज्वलन जिल्हा परिषद सभापती पी.जी.कटरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी के.वाय. सर्याम, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डब्ल्यु.एस. घोसे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती ओमप्रकाश मटाले, पंचायत समिती सदस्य जयप्रकाश शिवणकर, सरपंच ज्योती शहारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिता हुकरे, पोलीस पाटील तिलकचंद कटरे, दुर्गा बोपचे, छाया फुंडे, सुरेश पटले, ग्रामसेवक डी.डी. मेश्राम, लखनसिंह कटरे, केंद्रप्रमुख ए.टी. रामटेके, उच्च श्रेणी मुख्याध्यापक डी.बी.भगत, बेनेश्वर कटरे, एकनाथ खापर्डे, अनिल शहारे, परसराम पारधी, जितेंद्र पटले, चंद्रसेन बोपचे, नोहरलाल बोपचे व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी उषा मेंढे यांनी, विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानयुक्त नावीन्य शिक्षण देणे व सुसंस्कारित पिढी निर्माण करणे हे मुख्य उद्दीष्ट डिजीटल शाळेचे असावे असे मत व्यक्त केले. दरम्यान उपस्थित पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तावीक विठ्ठल सोनवाने यांनी मांडले. संचालन संदीप मेश्राम यांनी केले. आभार मुख्याध्यापीका गुणवंता नेवारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सर्व शिक्षक व गावकऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: The school was digitized by Amariteo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.